सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर आता साताऱ्यात आठवले आरपीआय गट आक्रमक झाला आहे. एका कार्यक्रमात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुले आता साताऱ्यातील आंबेडकर पुतळ्याजवळ आरपीआयच्या कार्यकर्तेनी एकत्र येऊन रास्ता रोको केला. तर कराड येथे निषेध रॅली काढत पोलिसांना निवेदन देण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या निषेध व्यक्त करण्यात आला. यानंतर संपूर्ण साताऱ्यात बाईक रॅली काढत सातारकरांना बंदची हाक दिली. त्यानंतर सर्व दुकाने बंद करण्यास सांगितले. आरपीआय स्टाईलमध्ये बाईक रॅली काढत दुकाने सर्व बंद केली. या माध्यमातून सातारकरांनी सातारा बंद ला मोठा प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसत आहे.
कराडात निषेध रॅली काढत निवेदन
कराड येथे विविध संघटना व राजकीय पक्षांनी एकत्रित येत रॅली काढली. शहरातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ते कराड शहर पोलिस ठाण्यापर्यंत घोषणा देत रॅली काढण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.