RRB Recruitment 2024 | मित्रांनो तुम्ही जर रेल्वेत रिक्त जागांची भरतीची वाट पाहत असाल. तर आता ही तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण आता रेल्वेमध्ये सरकारी नोकरी करण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. रेल्वे भरती बोर्डाने तंत्रज्ञ पदासाठी आता बंपर रिक्त जागा जाहीर केलेल्याआहेत. आणि यानुसार त्यांनी अधीसूचना देखील जाहीर केलेली आहे. या पदांसाठी तुम्हाला 9 मार्च 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरुवात होणार आहे.
आरआरबी द्वारे तंत्रज्ञ भरती 2023 साठी अधिसूचना देखील लवकरात जारी करत जाऊ शकते. तरी तुम्ही या सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरत जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता. आता याच भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महत्त्वाची तारीख
रेल्वेच्या या भरतीसाठी उमेदवार या पदांसाठी 9 मार्च 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.
त्याचप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 8 एप्रिल 2023 असणार आहे. म्हणजे जवळपास महिनाभर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी बराच वेळ मिळेल.
कोणत्या पदांवर भरती होणार | RRB Recruitment 2024
या भरतीमध्ये तंत्रज्ञांच्या एकूण 9000 रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. त्यामध्ये टेक्निशियन ग्रेड l सिग्नलची 1100 पदे असणार आहे. त्याचप्रमाणे टेक्निशियन ग्रेड lll सिग्नलची 7900 पदे भरायची आहेत
आवश्यक पात्रता
आरआरबी मधील तंत्रज्ञ पदावर अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे असणारी संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे. तर जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 36 एवढी आहे. तसेच तंत्रज्ञ lll पदांसाठी अर्ज करणारे उमेदवारांचे वय 18 वर्षापेक्षा कमी नसावे. आणि ते 33 वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज शुल्क
यावेळी तंत्रज्ञ ग्रेड l आणि ग्रेड lll पदांच्या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य उमेदवारांना अर्ज फी 500 रुपये एवढे आहे. तर एससी, एसटी, माजी सैनिक, पीडब्ल्यूडी महिला, ट्रांसजेंडर, अल्पसंख्यांक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांना केवळ 250 रुपये परीक्षा फी भरावी लागणार आहे.