RRB Technician Notification 2024 | तुम्ही जर रेल्वेमध्ये नोकर भरतीची वाट पाहत असाल तर आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे आता रेल्वे भरती मंडळाने तब्बल 9144 रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. आणि या रिक्त पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. रेल्वेची ही अर्ज भरती 9 मार्च 2024 पासून सुरु झालेली आहे.
उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 8 एप्रिल 2023 ही आहे. आता आपण ही रिक्त पदे सविस्तर जाणून घेऊयात.
रिक्त पदे | RRB Technician Notification 2024
तंत्रज्ञ श्रेणी – 1092 जागा
सिग्नल आणि तंत्रज्ञ श्रेणी lll – 8052 जागा
रेल्वेकडून ही परीक्षा एकाच टप्प्यात घेतला जाणार आहे त्यासाठी उमेदवारांच्या संबंधित पदाचा वैद्यकीय भेटण्यास देखील तपासला जाणार आहे.
काही महत्त्वाच्या गोष्टी
सर्वात मोठा बदल
आरआरबी तंत्रज्ञ भरतीमध्ये एकच पेपर होणार आहे. 2018 मध्ये जेव्हा 26000 एलपी तंत्रज्ञानाची भरती जाहीर झाली होती. तेव्हा तंत्रज्ञ पदांसाठी दोन टप्प्यांची परीक्षा घेण्यात आलेली होती. परंतु यावेळी एकाच टप्प्यात परीक्षा होणार आहे.
तंत्रज्ञ श्रेणी सिग्नल – 1092 पदे
पात्रता
बीएससी भौतिकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा संगणक विज्ञान बीइ किंवा बीटेक किंवा तीन वर्षाचा अभियांत्रिकी डिप्लोमा
तंत्रज्ञ ग्रेड lll – 8052 पदे | RRB Technician Notification 2024
पात्रता
संबंधित ट्रेडमध्ये दहावी पास किंवा आयटीआय पास असणे गरजेचे आहे
टेक्निशियन ग्रेड 3 ( S& T)
संबंधित उमेदवार हा दहावी आयटीआय किंवा बारावी भौतिकशास्त्र तसेच गणिता सह उत्तीर्ण असावी.
वयोमर्यादा
तंत्रज्ञ श्रेणी या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय हे 18 ते 36 दरम्यान असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे एसटी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची सूट आणि ओबीसींना 3 वर्षाची सूट मिळणार आहे.