अबब ! कोवीड कचरा संकलनासाठी प्रतिकिलो 100 रुपये

औरंगाबाद – रुग्णायांतील नियमित बायोमेडिकल वेस्टसाठी प्रतिबेड 5 रुपये तर वापरलेल्या पीपीई किट्स कचऱ्यासाठी 100 रुपये प्रतिकिलो एवढा दर मोजावा लागत आहे. कचरा संकलनाचा दर प्रति किलो 5 रुपयांवरून तब्बल 100 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचा मुद्दा जिल्हा रुग्णालय प्रशासनाने आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.

कोरोनामुळे रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. जिल्हा रुग्णालयात अनेक दिवस वैद्यकीय कचऱ्याचे ढीग पडून होते. बिल थकल्यामुळे हा कचरा संबंधित कंपनीकडून उचलण्यात येत नव्हता.

याविषयी वॉटर ग्रेस कंपनीचे संचालक चेतन बोरा यांच्याशी संपर्क साधला असता हे दर शासनाने ठरवून दिले आहेत, आम्ही वाढ केलेली नाही असे त्यांनी सांगितले.