जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता १५० रूपये : डॉ. सुरेश भोसले यांची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील धावरवाडी येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्याला सन २०२०-२१ या हंगामात ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना प्रतिटन १५० रूपयांचा दुसरा हप्ता जाहीर केल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी केली. तसेच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरही वर्ग करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकट काळात जयवंत शुगर्सने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊसबिलाची रक्कम उपलब्ध करून दिल्याने, शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जयवंत शुगर्सने सन २०२०-२१ च्या गळीत हंगामात १६० दिवसात एकूण ६ लाख ७६ हजार २९० मेट्रीक टन ऊसगाळप केले असून, सरासरी साखर उतारा १२.५७ टक्के राहिला आहे. तर ७ लाख २५ हजार ७०० क्विंटल साखर निर्मिती कारखान्याने केली आहे. कोरोनाच्या प्रतिकूल काळातही शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन कारखाना यशस्वीपणे चालविण्यात आला. कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पात आजअखेर ८३ लाख ४४ हजार लिटर अल्कोहोलची निर्मिती करून, त्यातून ८० लाख १८ हजार लिटर इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले आहे. या इथेनॉलची विक्री विविध ऑईल कंपन्यांना करण्यात आली आहे.

जयवंत शुगर्सने यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम ३०५० रूपयांपैकी २६०० रूपयांचा पहिला हफ्ता अदा केला आहे. तर एफआरपीचा दुसरा १५० रूपयांचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याने, शेतकऱ्यांना ऊसबिलापोटी आजअखेर प्रतिटन २७५० रुपये प्राप्त झाले आहेत, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.

Leave a Comment