सैन्यातील जवानाला ऑनलाईन अडीच लाखांचा गंडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे

जत शहरातीत मोरे कॉलनी येथे राहत असलेले चंद्रशेखर कदम यांची ऑनलाईन पध्दतीने 2 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याबतची फिर्याद चंद्रशेखर कदम यांनी जत पोलीस ठाण्यात दिली.

चंद्रशेखर कदम हे अरुणाचल प्रदेश येथे भारतीय सैन्यात दलात कार्यरत आहेत. सुट्टीमध्ये ते आपल्या जत या गावी आले होते. सैन्यदलात पुन्हा रुजू होण्यासाठी अरुणाचल प्रदेश येथे जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते. पण काही कारणामुळे ते जाऊ शकले नाहीत. त्यामुळे विमानाचे तिकीट बुक करण्यासाठी भरलेले पैसे परत घेण्यासाठी संबधीतला फोन केला होता. त्याच्याकडून एक मोबाईल अँप डाउनलोड करण्यास सांगितले व त्यामध्ये सर्व माहिती भरण्यास सांगितले. चंद्रशेखर कदम यांनी सर्व माहिती भरल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्या खात्यामध्ये असलेली रक्कम लंपास होत आहे.

यानंतर चंद्रशेखर यांनी तात्काळ पंजाब नॅशनल बँकेशी संपर्क करून सर्व हकीकत सांगितली. बँकेने तात्काळ खाते ब्लॉक केल्यामुळे चंद्रशेखर कदम यांच्या खात्यातील 45 हजार रुपये वाचले आहेत.या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. अधिक तपास जत पोलीस करत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment