आमच्या सरकारच्या काळात तरी कुठे झाले विलीनीकरण?; एसटी विलीनीकरण मागणीवरून महादेव जनकरांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकावर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून भाजपकडून निशाणा साधला जात आहे. मात्र, आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी एसटीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून भाजपला टोला लगावला आहे. “आमच्या सरकारच्या काळात विलीनीकरणाचा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हाही कुठे विलीनीकरण करण्यात आले? आपण रस्त्यावर बोलतो ते एक आणि आत गेल्यावर वेगळे असते, असे जानकरांनी म्हंटले आहे.

महादेव जानकर यांनी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमच्या काळातही एसटीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी आमच्या सरकारने काय केले नाही. त्यामुळे आमच्या सरकारच्या काळात विलीनीकरण झाले नाही. त्यामुळे आता जनतेने हुशार होणे गरजेचे आहे. हाच एकमेव मार्ग आहे.

,मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने केल्या जात असलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपमधील नेत्यांकडून महाविकास आघाडी सरकावर निशाणा साधला जात आहे. काल भाजप नेते गोपीचंद पडळकर व शेतकरी संघटनेचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पावित्रा घेत टीकास्त्र डागले होते. त्यानंतर आता माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाजपलाच घरचा आहेर देत टोले लगावले आहेत.

Leave a Comment