RSS ही दहशतवादी संघटना, त्यावर बंदी घाला – राजरत्न आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित खळबळजनक वक्तव्य केलं आहे. तुम्ही लोकांनी माझा पाकिस्तानातील व्हिडिओ पाहिला असेलच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतातील दहशतवादी संघटना आहे असं मी म्हणालो होतो. आरएसएसवर बंदी घाला. माझ्याकडे पुरावे आहेत, असं राजरत्न म्हणाले.

 

राजरत्न आंबेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात त्यांनी आरएसएसवर निशाणा साधला आहे. ‘तुम्ही लोकांनी माझा पाकिस्तानातील व्हिडिओ पाहिला असेलच. आरएसएस ही भारतातील दहशतवादी संघटना आहे हे मी तिथे म्हणालो होतो. आरएसएसवर बंदी घाला, माझ्याकडे पुरावे आहेत,’ असं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला एक साध्वी बसली आहे आणि ती मुलाखतीत सांगते की, भारतीय सैन्याजवळील दारूगोळा संपला, बंदुका, स्फोटकं संपली; तेव्हा आरएसएसनं स्फोटकं, दारुगोळा, बंदुका, बॉम्ब भारतीय सैन्याला पुरवले होते,’असंही ते म्हणाले.