राष्ट्रीय स्वयंसेवकसंघावर कायदेशीर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्या!- राजरत्न आंबेडकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
संविधान वाचवण्यासाठी मागील ६ वर्षापासून मी देशात व विदेशात लढत आहे. जर देशाचे संविधान वाचले तरच हा देश शांततेत राहिल, त्यासाठी केंद्राच्या सत्तेतुन फक्त नरेंद्र मोदी व अमित शाहांना हटवून चालणार नाही तर या पाठीमागे असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायदेशीर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी संविधान प्रिय सर्व जाती, धर्मातील लोकांनी देश हितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. असं वक्तव्य राजरत्न आंबेडकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील जिंतूरच्या आंदोलनाला डॉ .बाबासाहेब आंबेडरांचे पणतू ऍड. राजरत्न आंबेडकरांनी भेट दिली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरिल वक्तव्य केले आहे. सीएए, एनआरसी, कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलन सुरू आहे. परभणी जिल्ह्यात ही तालुकास्तरावर ठीक ठिकांनी धरणे आंदोलन सुरू आहेत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

केजरीवाल दहशतवादी असल्याचा आमच्याकडं भक्कम पुरावा- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि कसोटी मालिकेमधून जखमी रोहित शर्मा ‘आउट’ ; ‘या’ खेळाडूला मिळणार संधी

परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका; गहू, ज्वारीसोबत फळबागांचे लाखोंचे नुकसान

Leave a Comment