हैद्राबाद | आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमीच चर्चेत राहणारे अकबरुद्दीन ओवेसी आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आजारपणातून उठलेल्या अकबरूद्दीन ओवेसी यांनी एका सभेत भाषण करताना आरएसएसवाले माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाहीत असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानाने ते पुन्हा चर्चेत आले आहे.
या जगात जे घाबरतात त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. जे घाबरत नाहीत त्यांच्या नादी कुणी लागत नाही. मागे मी १५ मिनिटाचे जे वक्तव्य केले होते. त्याचा घाव त्यांच्या वर्मी बसला आहे. त्यामुळे ते आज देखील त्या वक्तव्याची याद काढत असतात असे अकबरुद्दीन ओवेसी म्हणाले आहेत. त्यांच्या हा विधानाने त्यांनी राजकारण्यांना त्यांच्या कमबॅकची झलकच दाखवून दिली आहे.
आरएसएसवर टीका करण्याची अकबरूद्दीन ओवेसींची काय पहिलीच वेळ नाही. त्यांनी या आधी देखील भाजप आणि आरएसएसवर खूपदा निशाणा साधला आहे. २०१३ साली अकबरुद्दीन ओवेसी यांनी आम्ही २५ कोटी आहोत १०० कोटी हिंदू आहेत पण १५ मिनिटे पोलीस बाजूला काढून बघा काय होते ते असे विधान अकबरुद्दीन ओवेसी यांनी केले होते. त्यांच्या या विधानाने चांगलेच राजकारण तापले होते.