औरंगाबाद | सध्या शैक्षणिक वर्षासाठीची आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत पहिल्या फेरीत 2 हजार 485 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर त्यासाठी पालकांना आतापर्यंत चार वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु आरटीईच्या ऍक्टनुसार 31 जुलैपर्यंत प्रवेश देता येत नसून दोन ऑगस्टला प्रवेश देणे बेकायदेशीर आहे. अशा आरटीओ एप्लीकेशन समोर नॉट अँप्रोच हे कारण किंवा कागदपत्र तपासणी करणाऱ्या समितीला बंधनकारक आहे. याप्रकरणी चौकशी व्हावी अशी मागणी आरटीई पालक संघाच्या वतीने केली जात आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश प्रक्रियेसाठी 603 शाळा पात्र असून प्रवेश क्षमता 3 हजार 625 आहे. ऑनलाइन प्रवेशासाठी 3 हजार 470 विद्यार्थी पात्र ठरले आहे. कोरोना महामारीमुळे पालकांना निर्माण होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन आतापर्यंत प्रवेशासाठी चार वेळा मुदत देण्यात आली होती. आजपर्यंत 2 हजार 485 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत.
कोणताही विद्यार्थी आरटीई प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहू नये म्हणून काम करणाऱ्या पालक संघाने दोन ऑगस्ट नंतर झालेल्या प्रवेशाबाबत चौकशी करावी अशी मागणी आरटीई पालक संघाचे अध्यक्ष प्रशांत साठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि शिक्षण विभागास केली आहे.