पंधरा लाखाची लाच घेताना माहिती अधिकार कार्यकर्ता अटकेत; घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : उद्योजकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडुन खंडणी उकळणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला शहर गुन्हे शाखेच्या पथकाने पंधरा लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई रात्रीच्या सुमारास टाऊन हॉल भागात सिटी चौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. जद्दी मिर फकर अली मिर जाफर अली असे खंडणीखोराचे नाव आहे.

या घटने प्रकरणी अधिक माहिती अशी की, टाऊन हॉल परिसरात राहणारे बॉम्बे क्लासचे मालक शेख साबीर मोहम्मद शरीफ यांना गेल्या दोन वर्षापासून आरोपी जद्दी मिर फकर हा माहिती अधिकार टाकून त्यांच्या मालमत्तेची तसेच त्यांनी बांधकाम केलेल्या इमारतींची माहिती मागत होता. माहिती अधिकार अर्ज टाकू नये म्हणून तो शेख साबीर यांच्याकडे पंचवीस लाखांची खंडणी मागत होता.

पहा व्हिडिओ 

https://fb.watch/v/3ujZT_ZO1/

त्या दोघांमध्ये झालेल्या तडजोडी अंती 15 लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र शेख यांची इच्छा नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शेख यांच्या कार्यालय जवळ सापळा रचला आणि आरोपी जद्दी मीर हा पैशे घेऊन कार्यालय बाहेर निघताच त्याला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. ही सर्व घटना तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment