सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) परिसरात आज दुपारी रिक्षाची धडक कर्मचाऱ्याला बसल्याने ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर जखमीला तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही
याबाबत प्राथमिक माहिती अशी, बुधवारी दुपारी वाहनांची टेस्ट सुरू होती. त्यावेळी एका रिक्षाचा अपघात होऊन ती आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्याला धडकली. रिक्षाचा दणका जोरात बसल्याने कर्मचारी गंभीर जखमी झाला. अपघातानंतर जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमीची माहिती घेतली आहे.
रिक्षाची ब्रेक टेस्ट घेत असताना ब्रेक न लागल्या मुळे आणि वाहनाचा ताबा न मिळवता आल्यामुळे त्याठिकाणी अपघात घडून आला . त्यामध्ये मोटार वाहन निरीक्षक धनंजय कुलकर्णी जखमी झाले असून त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांच्यावर योग्य प्रकारे उपचार सुरू असून ते धोक्याच्या बाहेर आहेत असं सातारा उपप्रदेश परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’