महामार्गावरील गुन्हेगारांना पडकण्यासाठी RTO लढवणार अशी शक्कल

Mumbai-Pune Expressway RTO (1)
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या महामार्ग आणि रस्ते ह्या ठिकाणी अपघात आणि गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढताना दिसून येत आहे. त्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील (Mumbai-Pune Expressway) आणि पुणे-कोल्हापूर महामार्गावरील (Pune – Kolhapur Highway) शहरांमधील वाहतूक गुन्हेगारांना पकडण्यासाठी RTO ने सिसिटीव्ही कॅमेऱ्याची मोहीम हाती घेतली आहे. RTO ने अधिकाऱ्यांचे पथक तयार करून महामार्गांवरील गुन्हेगारी कमी करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. यामुळे भविष्यात गुन्हेगारी किंवा महामार्गावरील अपघात यांसारख्या घटनांवर अंकुश राहील अशी आशा आहे.

महामार्गांवर गाडीचा जास्त वेग, चुकीच्या पद्धतीने पार्क केलेली वाहने, लेन कटिंग, ड्रंक अँड ड्राईव्ह, यासारख्या गुन्ह्यांची मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर RTO पथकांकडून तपासणी केली जाईल. निगराणी दरम्यान गुन्हेसुदृश घटना घडत असेल तर त्या नागरिकांचे समुपदेशन कक्षात नेऊन त्याचे समुपदेशन केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक टोलनाक्याजवळ समुपदेशन कक्ष सुद्धा उभारले जाणार आहेत.

महामार्गांवर RTO चे विशेष पथक तैनात :

मुंबई – पुणे एक्सप्रेसवे आणि पुणे – कोल्हापूर महामार्गांवर ही विशेष पथके तैनात असतील. जी की महामार्गांवरील गिन्हेगारीवर नियंत्रण ठेवतील . RTO ने बनवलेल्या विशेष पथकात 4 अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे. ज्या मध्ये 2 अधिकारी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवतील . उर्वरित 2 अधिकारी समुपदेशन करतील . या संपूर्ण अभियानात पुणे, सातारा, सांगली, कराड आणि कोल्हापूर येथील RTO चा समावेश असेल. तसेच पुणे – मुंबई एक्सप्रेसवे दरम्याम राबवल्या जाणाऱ्या अभियानात मुंबई , पुणे, पिंपरी-चिंचवड , पनवेल आणि पेन येथील RTO अधिकारी मदत करतील