सिटीस्कॅनसाठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत असून त्याव्दारा अचूक निदान होत आहे. तरी कोरोनाचे निदान करण्यासाठी सिटीस्कॅन (एचआरसीटी ) करु नये, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी येथे दिले. सिटीस्कॅन करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल रुग्णांकडे असणे बंधनकारक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाच्या निदानासाठी करण्यात येत असलेल्या सिटीस्कॅनच्या तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरासंदर्भातील नियमावलीबाबतच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुनील चव्हाण बोलत होते.

यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, आयएमएचे डॉ. व्हि रंजलकर, डॉ. यशवंत गाडे, निमाचे डॉ. गिरीश डागा, डॉ. प्रवीण बेरड, डॉ. विजय चौधरी, रेडीओलॉजिस्ट संघटनेचे डॉ. शरद कोंडेकर यांच्यासह सर्व संबधिंत उपस्थित होते. तसेच सिटी स्कॅनचा वापर आवश्यक असेल अशा ऑक्सीजन पातळी कमी झालेल्या, इतर गंभीर स्थितीतील कोरोना बाधितांसाठीच केला जावा, असे निर्देशित केले. जिल्ह्यातील सिटीस्कॅन केंद्र समूह संसर्गाचे प्रमुख ठिकाण बनले असून तातडीने अनावश्यक सिटीस्कॅन थांबवण्याच्या सूचना केंद्रीय पथकाने जिल्ह्यातील पाहणी दौऱ्यानंतर दिलेल्या आहे.

त्या पार्श्वभूमीवर सर्व संबधितांनी कटाक्षाने खबरदारी घेत आरटीपीसीआर चाचणीचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त असलेल्या तसेच उपचार करत असलेल्या संबधिंत डॉक्टरांनी संदर्भित केलेल्या तसेच आवश्यकता असलेल्या कोरोना बाधितांचेच सिटीस्कॅन करावे. सिटीस्कॅन केलेल्या रूग्णांची माहिती विहित नमुन्यात सिटीस्कॅन केंद्रानी महानगरपालिकेस नियमितपणे सादर करावी, असे चव्हाण यांनी निर्देशित केले.

Leave a Comment