पुण्यात रुबी हॉल क्लिनिकचे 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । करोना संसर्गाच्या बाबतीत महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वाधिक धोकादायक जिल्हा बनलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयातील डॉक्टर, नर्स वॉर्डबॉय यांच्यासह २५ जणांना करोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे. रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बोमी भोट यांनी ही माहिती दिली. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये १९ नर्स आणि ३ डॉक्टरांचा समावेश आहे. त्यामुळं जिल्ह्यातील बाधितांचा आकडा ७५६ वर पोहोचला आहे.

मुंबईनंतर राज्यात सर्वाधिक करोना रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यातही पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील रुग्णांची संख्या जास्त आहे. पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या आतापर्यंत ७५६ वर पोहोचली आहे. त्यात पुणे शहरातील ६४७, पिंपरी चिंचवड ५८, पुणे ग्रामीण २४ आणि पुणे कँटोन्मेंट- जिल्हा रुग्णालय २७ जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात काल एका दिवसात ८७ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात पुणे शहरातील ८५ तर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रत्येकी एकाचा समावेश होता. आतापर्यंत १३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

राज्यात करोनाबाधितांची रुग्ण संख्या अद्यापही वाढतच आहे. आज सकाळी दहा वाजेपर्यंत राज्यात 472 नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असुन एकूण रुग्ण संख्या 4 हजार 676 वर पोहचली आहे. तर आणखी नऊ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. याबरोबरच आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या 232 वर पोहचली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

Leave a Comment