Ruchi Soya FPO: गुंतवणूकदारांना अजूनही पडलेली नाही रुची सोयाची भुरळ, लोकांनाही त्यात रस नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली आयुर्वेदच्या मालकीच्या रुची सोयाच्या फॉलो-ऑन पब्लिक ऑफर (FPO) मध्येही आज मंदी दिसून आली. संस्थात्मक खरेदीमुळे हा इश्यू= दुसऱ्या दिवशी 0.3 पट किंवा 30% सब्सक्राइब झाला. पहिल्या दिवशी फक्त 12 टक्के सब्सक्राइब झाला.

रिटेल गुंतवणूकदार वर्गाने आतापर्यंत 34% पर्यंत सब्सक्राइब केले आहे, तर क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्स (QIB) विभागाला 41% साठी बोली मिळाली आहे. दरम्यान, बिगर संस्थागत गुंतवणूकदारांनी यात रस दाखवलेला नाही. हा विभाग केवळ 9% सब्सक्राइब झाला आहे.

एकूण, रुची सोया FPOला 4.89 कोटी शेअर्सच्या ऑफर आकाराच्या तुलनेत केवळ 1.52 कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली मिळाली आहे. 24 मार्च रोजी लॉन्च करण्यात आलेला हा इश्यू 28 मार्चपर्यंत खुला राहणार आहे. यावेळी बोली लावता येईल. शुक्रवारी रुची सोयाच्या शेअरची किंमत राष्ट्रीय शेअर बाजारात 0.60 टक्क्यांनी घसरून 867.60 रुपयांवर बंद झाली.

₹4,300 कोटी उभारण्याची योजना आहे
रुची सोयाने कंपनीला कर्जमुक्त करण्यासाठी FPO द्वारे ₹4,300 कोटी उभारण्यासाठी भांडवली बाजारात प्रवेश केला. याचा प्राईस बँड प्रति शेअर ₹ 615 ते ₹ 650 पर्यंत निश्चित करण्यात आला आहे.

रामदेव म्हणाले की,” रशिया आणि युक्रेनमधील शेअर बाजारात अस्थिरता असतानाही कंपनीने FPO लाँच केला आहे.” ते म्हणाले की,” कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून आधीच ₹1,290 कोटी उभे केले आहेत आणि विश्वास आहे की, त्याचा FPO यशस्वी होईल, कारण लोकांचा तिच्या उत्पादनांवर आणि ब्रँडवर विश्वास आहे.” बाबा रामदेव पुढे म्हणाले की,” FPO कडून मिळालेली रक्कम 3,300 कोटी रुपयांच्या टर्म लोनची परतफेड करण्यासाठी वापरली जाईल.”

बाबांचा वाटा कमी होईल
सध्या रुची सोयामध्ये पतंजली समूहाचा सुमारे 98.9% हिस्सा आहे. पब्लिक शेअरहोल्डर्सकडे सुमारे 1.1% शेअर्स आहेत. FPO नंतर रुची सोया मधील पतंजली समुहाची हिस्सेदारी सुमारे 81 टक्क्यांवर येईल आणि लोकांची भागीदारी सुमारे 19 टक्के असेल.

Leave a Comment