Saturday, March 25, 2023

रुक्मिणी मातेच्या ८ हजार साड्यांची अल्प दरात विक्री; साडी विक्रीतून मंदिर समितीला २० लाखांचे उत्पन्न

- Advertisement -

टीम हॅलो महाराष्ट्र । राज्य भरातील भाविकांनी रुक्मिणी मातेस अर्पण केलेल्या ८ हजार किंमती साड्यांची अल्प दरात भाविकांना विक्री केली. या साडी विक्रीतून विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला तब्बल २० लाख २१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे या साडीविक्रीतुन आलेल्या पैशांचा मंदिर समितीला उपयोग होणार आहे. रुख्मिनी मातेच्या साड्या खरेदी करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान दरवर्षी भाविक रुक्मिणी मातेलाल विविध सण समारंभाच्या निमित्ताने भरजारी व किंमती साड्या अर्पण करतात, अशा साड्यांची मंदिर समितीच्या वतीने दरवर्षी विक्री केली जाते. यावर्षीही नुकताच सेल लावण्यात आला होता. यामध्ये विविध प्रकारच्या ८ हजार साड्यांची विक्री झाली. या विक्रीतून मंदिर समितीला २० लाख २१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे. या आलेल्या पैशाचा मंदिराच्या चांगल्या कामासाठी उपयोग केला जाणार आहे. अशी माहिती ही मंदिर समितीने दिली आहे.

- Advertisement -

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

बाळासाहेबांचा कोणता नातू महाराष्ट्राचं राजकारण गाजवणार? जयंतीदिनी अमित आणि आदित्य ठाकरेंचं शक्तिप्रदर्शन

जेव्हा ‘उद्धव’ रोहित पवार यांच्या हातून चप्पल घालतात..

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन