हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक महिन्याला काहींना काही बदल होत असतात. त्याचप्रमाणे डिसेंबर महिनाही काही महत्वाचे बदल घेऊन आला आहे. या बदलामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमती , क्रेडिट कार्ड नियम, टेलिकॉम आणि हवाई प्रवासाशी संबंधित आहेत. या बदलामुळे लोकांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होताना दिसणार आहेत. हे बदल 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. तर चला या प्रमुख बदलाबद्दल माहिती पाहुयात.
एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 1 डिसेंबर 2024 पासून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. ही वाढ फक्त 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरसाठी लागू आहे. पण घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल
1 डिसेंबरपासून SBI कार्डने आपल्या क्रेडिट कार्ड धारकांसाठी डिजिटल गेमिंग आणि मर्चंट ट्रान्झॅक्शनवर रिवॉर्ड पॉइंट देणे बंद केले आहे. तसेच यस बँकेने हॉटेल आणि फ्लाइट बुकिंगसाठी रिडीम होणाऱ्या पॉइंट्सची संख्या कमी केली आहे. त्याचसोबत एचडीएफसी बँकेच्या रेगालिया कार्ड धारकांना आता प्रत्येक तिमाहीत 1 लाख रुपये खर्च केल्यावरच लाउंज एक्सेस मिळणार आहे.
एटीएफच्या किमतीत वाढ
ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी 1 डिसेंबरपासून एअर टर्बाईन फ्युएलच्या (ATF) किमतीत वाढ केली आहे, या वाढीमुळे हवाई प्रवास महाग होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. तसेच मालदीवमध्ये 1 डिसेंबरपासून डिपार्चर फी वाढवण्यात आली आहे. इकोनॉमी क्लाससाठी ही फी $30 वरून $50 करण्यात आली आहे. बिजनेस क्लाससाठी ही फी $60 वरून $120 तर फर्स्ट क्लाससाठी $90 वरून $240 केली आहे. खासगी जेट प्रवास करणाऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे.
ट्राईचे नवीन ट्रेसेबिलिटी नियम लागू
टेलिकॉम रेगुलेटर TRAI (ट्राई) स्कॅम आणि फिशिंगला आळा घालण्यासाठी ओटीपीसह कमर्शियल मेसेजच्या ट्रेसेबिलिटीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे 1 डिसेंबर 2024 पासून लागू करण्याची योजना आखत आहे. पूर्वी हे 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होण्याची अपेक्षा होती. या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत सर्व टेलिकॉम ऑपरेटर आणि मेसेजिंग सर्व्हिस प्रोवायडर्सना प्रत्येक मेसेजच्या उगम आणि प्रामाणिकतेची तपासणी करणे बंधनकारक करण्यात येईल. तसेच या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे ओटीपी मेसेज येण्यास जास्त वेळ लागणार नाही .
स्पेशल एफडी स्कीम बंद
काही बँका त्यांच्या ग्राहकांना मर्यादित काळासाठी विशेष फिक्स्ड डिपॉझिट योजनांची ऑफर करतात. अशीच दोन प्रकारच्या योजना IDBI बँकेची उत्सव FD आणि पंजाब अँड सिंध बँकेची स्पेशल FD योजना हि 1 डिसेंबर 2024 रोजी बंद होणार आहे. या सर्व बदलांमुळे सामान्य नागरिकांपासून व्यावसायिकांपर्यंत सर्वांवर परिणाम होणार आहे.