Rule Change From 1 March : 1 मार्चपासून बदलणार हे आर्थिक नियम; तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Rule Change From 1 March : आज २९ फेब्रुवारी… म्हणजे महिन्याचा अखेरचा दिवस असून उद्या १ मार्च पासून नवा महिना सुरु होईल. नवा महिना सुरु होताच काही आर्थिक बदलांना आपल्याला सामोरे जावं लागत, कारण दर महिन्याच्या सुरुवातीपासून काही नवीन सरकारी नियम लागू होतात. आता 1 मार्चपासून तुमच्या बजेटशी संबंधीत काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावरही होणार आहे. आज आपण जाणून घेऊयात

गॅस सिलिंडरच्या किमती –

गॅस सिलिंडर हि जीवनावश्यक गोष्ट आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सरकारकडून एलपीजीच्या किमतीचा आढावा घेतला जातो आणि नवीन किमती जाहीर केल्या जातात. फेब्रुवारी महिन्यात सरकारने एलपीजीची किमतीत कोणताही बदल न करता त्या आहे तशाच ठेवल्या होत्या. त्यानुसार, 14.2 किलो घरगुती LPG गॅस सिलेंडरचा दर दिल्लीत 1053 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये, बेंगळुरूमध्ये 1055.50 रुपये, चेन्नईमध्ये 1068.50 रुपये आणि हैदराबादमध्ये 1,105.00 रुपये प्रति सिलेंडर आहे. मात्र आता मार्च महिन्यात (Rule Change From 1 March) सरकारकडून गॅस सिलिंडरच्या किमतीत नेमका काय बदल होतो याकडे सर्वसामान्य जॅनेटचे लक्ष्य लागले आहे.

सोशल मीडिया – Rule Change From 1 March

आजकाल सोशल मीडिया म्हणजे जीवनाचा भाग झाला आहे. अनेक युवक मोठ्या प्रमाणात फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम सारख्या सोशल मैद्याचा सर्रास वापर करत असतात. परंतु सरकारने अलीकडेच आयटी नियम बदलले आहेत. यानंतर X, Facebook, YouTube आणि Instagram या सोशल मीडिया ॲप्सना हे नियम पाळावे लागतील. मार्च महिन्यापासून सोशल मीडियावर चुकीच्या तथ्यांसह कोणतीही बातमी प्रसारित झाल्यास त्यासाठी दंड आकारला जाईल. यातून सोशल मीडिया सुरक्षित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

फास्टॅगचे नियम –

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅगचे KYC अपडेट करण्याची अंतिम तारीख आज म्हणजेच २९ फेब्रुवारी निश्चित केली आहे.त्यामुळे तुमच्या आजच्या आज KYC अपडेट करण्याची गरज आहे. असं न केल्यास तुमचा फास्टॅग डिएक्टिवेट केला जाऊ शकतो आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांद्वारे ब्लॅक लिस्टमध्ये टाकला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत 29 फेब्रुवारीपूर्वी म्हणजे आजच्या आज तुमचे फास्टॅग केवायसी करा.