सुकन्या समृद्धी, PPF सह सरकारच्या इतर बचत योजनांचे बदलणार नियम; जाणून घ्या सविस्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सरकारच्या माध्यमातून अनेक विविध योजना नागरिकांपर्यंत पोहचलेल्या आहेत. त्याचा फायदा अनेक नागरिकांना होत आहे. सरकारच्या माध्यमातून अल्पबचत योजना देखील सुरू आहेत. त्यामध्ये पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील अनेक योजना आहेत. त्यात अनेक नागरिक गुंतवणूक करत असतात. आता सुकन्या समृद्धी योजना तसेच यासोबत इतर काही ज्या लहान मोठ्या योजना आहेत. त्याच्याबाबत काही नियम बदललेले आहेत. आणि सरकारकडून याबाबत परिपत्रक देखील जारी करण्यात आलेले आहे. या योजनांमध्ये जे काही बदल होणार आहेत. ते सरकारने जाहीर केलेले आहेत. या अल्पबचत योजनांमध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजना सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ, एमपीएस, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पोस्ट ऑफिस, किसान विकास पत्र, भविष्य निर्वाह निधी योजना यांसारख्या अनेक योजनांचा लाभ समावेश आहे. ज्याचा लाभ नागरिकांना होत असतो. आता या योजनेबाबत 1 ऑक्टोबर 2024 पासून नवीन नियम लागू होणार आहेत.

सरकारने या योजनेसाठी श्रेणी निश्चित केलेल्या आहेत. यामध्ये विसंगत एनएसएस खाती अल्पवयीन मुलांच्या नावाने उघडलेली पीपीएफ खाती तसेच एनआरआर एक्सटेंडेड तसेच पालकांसह आजी आजोबांनी उघडलेली सुकन्या समृद्धी योजनेतील खाती यांचा समावेश आहे. आता यात कोणते बदल होणार आहेत हे आपण जा.

सुकन्या समृद्धी योजनेचे नियम

जर कोणत्याही मुलीच्या नावाने आजी आजोबा किंवा कायदेशीर पालकांशिवाय इतर कुणी सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडले असेल, तर त्याचे पालकत्व चेक केले जाईल. मुलाच्या पालकाची बदली कायदेशीर पालकांकडे केली जाईल. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत केवळ एकाच मुलीचे खाते उघडता येते. परंतु पडताळणी नंतर जर एकाच कुटुंबातील दोन मुलींचे खाते उघडले असेल, तर एसएस वाय 2019 च्या परिच्छेद 3 चे उल्लंघन केल्याप्रकरणी तुमची खाती बंद केली जाईल.

पीपीएफ संबंधित नियम

पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंटवर मॅच्युरिटीच्या कालावधीपर्यंत म्हणजेच 18 वर्षेपर्यंत व्याज तर मिळेल. यानंतर पब्लिक प्रॉव्हिडंट फंडा नुसार देखील तुम्हाला या व्याज मिळू शकते. अनेक लोक हे भारतातील रहिवासी नसूनही भारतातील रहिवासी असल्याचे सांगून पीपीएफ खाते ओपन करतात. तोपर्यंत अशावेळी पोस्ट ऑफिस बचत खात्याच्या व्याजदराचा लाभ होणार आहे. याचा फायदा गुंतवणूकदारांना होईल जे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत भारताचे अनिवासी असतील. जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते असतील, तर तुमच्या पहिल्या खात्यावरच तुम्हाला व्याज दिले जाईल. आणि इतर सर्व खादी पहिल्या खात्यामध्ये विलीन केली जातील आणि त्या रकमेवर एकूण व्याज तुम्हाला दिले जाईल.