Rules Changed from 1 April : Gas सिलेंडर पासून ATM पर्यंत… 1 एप्रिल पासून बदलणार हे नियम

Rules Changed from 1 April
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १ एप्रिल पासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. नव्या आर्थिक वर्षात सरकार कडून अनेक नियम बदलण्यात आले (Rules Changed from 1 April) आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्यावर होणार आहे. Gas सिलेंडर पासून ATM पर्यंत… अनेक ठिकाणी तुम्हाला या बदलाचा सामना करावा लागेल.. म्हणजेच काय तर घरातील स्वयंपाकघरापासून ते बँक खाते आणि क्रेडिट कार्ड धारकांपर्यंत सर्वांनाच याचा फटका बसणार आहे. त्यामुळे हे बदल नेमके आहेत तरी काय? ग्राहकांना नव्या बदलाचा कसा दणका बसू शकतो हेच आपण थोडक्यात समजून घेऊयात.

१) Gas सिलेंडर वर परिणाम

तेल आणि वायू वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी LPG Gas सिलेंडर च्या किमती जाहीर करत असतात. त्यामुळे नेहमीप्रमाणे १ एप्रिलला (Rules Changed from 1 April) तुम्हाला गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल झालेला बघायला मिळेल. मागील अनेक महिन्यापासून LPG Gas सिलेंडर च्या किमतीत वाढ झालेली नाही, मात्र नवीन आर्थिक वर्षात गॅसच्या किमतीत वाढ होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

२) क्रेडिट कार्डवरील बदल– Rules Changed from 1 April

नव्या आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डधारकांसाठी असे अनेक बदल होणार आहेत, ज्याचा परिणाम त्यांच्या यूजर्सवर होऊ शकतो. एकीकडे, एबीआयच्या सिम्पली क्लिक क्रेडिट कार्डने स्विगी रिवॉर्ड्स पॉइंट्स १० पट वरून ५ पट करण्याची घोषणा केली आहे, तर एअर इंडियाने सिग्नेटर्स पॉइंट्स ३० वरून १० पर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर पडेल.

3) ATM मधून पैसे काढणे महागणार-

नव्या आर्थिक वर्षात ATM मधून पैसे काढणे महागणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने इंटरचेंज शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ग्राहकांना मोफत मर्यादा संपल्यानंतर ‘एटीएम’मधून होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी अतिरिक्त दोन रुपये द्यावे लागतील. येत्या १ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. आरबीआयच्या या निर्णयाने ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे.खरं तर मोफत मर्यादा संपल्यानंतर ‘एटीएम’मधून होणाऱ्या प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी याच्या आधी १७ रुपये शुल्क होते, आता यात २ रुपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना १९ रुपये मोजावे लागणार आहेत.

4) UPI खाती बंद होतील

आजकाल पेमेंटसाठी UPI खूप लोकप्रिय आहे. अनेकजण UPI च्या माध्यमातून एकमेकांना पैसे पाठवत असतात.. परंतु असेही काही मोबाईल नंबर आहेत जे UPI खात्यांशी जोडलेले आहेत परंतु सक्रिय नाहीत ते १ एप्रिलपासून बंद केले जातील. यासोबतच, ते बँक रेकॉर्डमधून देखील काढून टाकले जातील. याचा अर्थ असा की जर तुमचा कोणताही मोबाईल नंबर UPI शी लिंक असेल, परंतु वापरला जात नसेल, तर तो बंद केला जाईल. त्यामुळे याचा सुद्धा मोठा परिणाम सर्वसामान्य माणसाच्या जीवनपद्धतीवर होईल.