हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल Aadhaar Card हे महत्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. भारतात जवळपास प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्डचा वापर केला जातो आहे. अशा परिस्थितीत अनिवासी भारतीय म्हणजेच NRI लाही आधार कार्ड बनवता येईल का??? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. तर याचे उत्तर होय असे आहे. सामान्य भारतीय नागरिकांप्रमाणेच अनिवासी भारतीयांनाही आधार कार्ड मिळू शकते. याविषयी माहिती देताना UIDAI ने सांगितले की, परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांही आधार कार्ड बनवता येते. मात्र यासाठी काही अटी आणि नियम आहेत.
हे लक्षात घ्या की, कोणत्याही NRI ला भारतातील कोणत्याही शहरातील आधार सेवा केंद्रातून Aadhaar Card साठी अर्ज करते येतो. तिथे आपली संपूर्ण माहिती देऊन त्यांना आधार कार्ड बनवता येते. यासोबतच ऑनलाइन सुविधा वापरूनही त्याला आधार कार्ड अपडेट करता येईल. मात्र, यासाठी त्याच्याकडे वैध पासपोर्ट असणे आवश्यक आहे. याशिवाय, जर पती/पत्नी NRI असेल, तर त्याचा/तिचा पासपोर्ट बनवण्यासाठी कागदपत्र म्हणून भारतीय पासपोर्ट असणे बंधनकारक आहे.
याविषयीचे नियम जाणून घ्या
UIDAI च्या माहिती नुसार, लॉन्ग टर्म व्हिसा (LTV) डॉक्युमेंटस धारकाला देखील Aadhaar Card मिळवता येते. मात्र यासाठी ते अर्ज केल्याच्या तारखेपासून 182 दिवस किंवा त्याहून जास्त दिवस भारतात राहिले असले पाहिजे. ज्या अनिवासी भारतीयाला भारतात आधार कार्ड काढायचे आहे त्यांच्याकडे भारताचा वैध पासपोर्ट असणे आवश्यक असेल. त्यांना हा पासपोर्ट पत्त्याचा पुरावा म्हणूनही वापरता येईल. यासोबतच आधार कार्ड काढण्यासाठी आपल्याकडे भारतीय मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. यासोबतच एक ईमेल आयडी देखील द्यावा लागेल.
यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या
1. अनिवासी भारतीयांना आपले Aadhaar Card आधार केंद्रावरून सहजपणे मिळेल.
2. यासाठी NRI ला आधार फॉर्म भरावा लागेल.
3. हा फॉर्म सामान्य आधार फॉर्मपेक्षा थोडा वेगळा आहे.
4. यासोबत, आपल्याला वैध भारतीय पासपोर्ट सोबत ठेवावा लागेल.
5. आता या फॉर्ममध्ये मागितलेली सर्व माहिती भरल्यानंतर आपला ई-मेल आयडी द्यावा लागेल.
6. आयडी प्रूफ म्हणून फक्त पासपोर्टची कॉपी सबमिट करता येईल.
7. यानंतर, आधार केंद्रावर बायोमेट्रिक डिटेल्स सबमिट करावे लागतील.
8. यानंतर, आधार केंद्रावर 14 क्रमांकाचा एनरोलमेंट आयडी मिळेल.
10. याद्वारे आपल्याला आधारची स्थिती सहजपणे तपासता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/
हे पण वाचा :
New Business Idea : शेतीबरोबरच ‘हा’ व्यवसाय सुरू करून दरमहा मिळवा लाखो रुपयांचे उत्पन्न
FD Rates : बँकेमध्ये FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता काही महिन्यातच पैसे होणार दुप्पट
Bank of Baroda च्या ग्राहकांनी लवकरात लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते
Bank FD : ‘या’ 5 सरकारी बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत भरपूर व्याज, जाणून घ्या व्याजदर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती महागल्या, पहा आजचे नवीन भाव