१ जुलैपासून बदलणार ‘या’ सरकारी स्किमचे नियम; करोडो लोकांवर होणार परिणाम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेतील ‘अटल पेंशन योजना’ यामध्ये ऑटो डेबिटमधून सुट देण्याची मुदत ही 30 जून रोजी संपुष्टात येत आहे. यानंतर 1 जुलैपासून या योजनेत बचत झालेल्या लोकांच्या खात्यातून ऑटो डेबिट पुन्हा एकदा सुरू होईल. यासाठी 11 एप्रिल रोजी ‘पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी’ (पीएफआरडीए)ने 30 जूनपर्यंत एपीवाय अंतर्गत ऑटो डेबिट थांबविण्याचे आदेश बँकांना दिलेत. पीएफआरडीएने मेलद्वारे या योजनेच्या ग्राहकांना सांगितले होते की 1 जुलैपासून ऑटो डेबिट सुरू होईल.

30 जून पर्यंत अटल पेन्शन योजनेंतर्गत बँक खात्यातून ऑटो पेमेंट करण्याच्या निर्णयाबाबत पीएफआरडीए म्हणाले, ‘या योजनेतील बहुतेक ग्राहक हे समाजातील खालच्या स्तरातील आहेत. कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे त्यांच्यवर सर्वाधिक परिणाम झाला आहे.

सदस्यांना पाठविलेल्या मेलमध्ये पीएफआरडीएने नमूद केले आहे की, जर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कोणत्याही पेन्शन योजनेचे खाते नियमित केले गेले नाही तर त्यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही. पीएफआरडीएने पुढे लिहिले की, “एप्रिल 2020 ते ऑगस्ट 2020 मधील आपले नॉन-डिडक्टेड एपीवाय योगदान रेग्युलराइज्ड केले नाही तर त्याच्यावरही दंड आकारला जाणार नाही.”

सामान्यत: एखादा अकाउंट होल्डरने या योजनेत उशीरा पेमेंट केल्यास त्यांच्याकडून दंड आकारला जातो. अटल पेन्शन योजनेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, दंड करण्याचे नियम हे खालीलप्रमाणे आहेतः

>> दरमहा 100 रुपयांच्या योगदानावर 1 रु दंड

>> दरमहा 101 ते 500 रुपयांच्या योगदानावर 2 रुपये दंड

>> दरमहा 501 ते 1000 रुपयांच्या योगदानावर 5 रुपये दंड

>> दरमहा 1.001 रुपयांच्या योगदानावर 10 रुपये दंड

अटल पेन्शन योजना ही केंद्र सरकारची एक सोशल सिक्योरिटी स्कीम आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दरमहा 1000 ते 5000 पर्यंतची पेन्शन देते. 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या अटल पेन्शन योजनेमध्ये खाते (एपीवाय खाते) उघडू शकते. या सरकारी योजनेची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेत जितक्या लवकर गुंतवणूक केली जाईल तितका अधिक निधी जमा होईल.

वयाच्या 25 व्या वर्षापासून दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कोणत्याही 25 वर्षांच्या व्यक्तीस जर या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर त्यांना दरमहा केवळ 376 रुपये गुंतवावे लागतील. अशाप्रकारे, वयाच्या 25 व्या वर्षापासून, दरमहा फक्त 376 रुपये जमा केल्यानंतर वयाच्या 60 वर्षानंतर, त्यांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळू शकेल.

या अटल पेन्शन योजनेसाठी आपण अकाउंट कोठे उघडू शकता?
या योजनेतील पेंशनरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जोडीदारासही लाभ देण्याची यामध्ये तरतूद आहे. तसेच त्याच्या मुलांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल. या योजनेचे एक वैशिष्ट्य म्हणजे आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत या योजनेत गुंतवणूक केल्यास आपल्याला टॅक्स मध्ये सूट देखील मिळते. मात्र कोणतीही व्यक्ती केवळ एकच अटल पेन्शन खाते उघडू शकते. तसेच ते कोणत्याही सरकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment