मुंबई : ‘सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा २०१९’ चे आयोजन ८ एप्रिल ते २२ मे २०१९ या कालावधीत करण्यात आले असून विजेत्या गावांपैकी प्रथम क्रमांकाला ७५ लाख, द्वितीय क्रमांकाला ५० लाख तर तृतीय विजेत्याला ४० लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक तालुक्यात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेत विजयी होणाऱ्या गावांना देण्यात येणाऱ्या एकूण बक्षिसांची रक्कम ९ कोटी १५ लाख रुपये इतकी आहे. राज्याच्या जल समृद्धीचा प्रवास अखंड सुरु राहण्यासाठी पानी फाऊंडेशनने निवडलेल्या तालुक्यांतील सर्व गावांना आमंत्रण देण्यात आले आहे. सत्यमेव जयते वाॅटर कप’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील नियम आहेत.
१) निवडलेल्या तालुक्यातील प्रत्येक महसूली गाव या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र आहे.
२) राज्यातील २४ जिल्ह्यांतील ७६ तालुक्यांमध्ये यावर्षी ही स्पर्धा होणार आहे.
३) स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ३१ जानेवारी २०१९ पर्यंत फॉर्म भरता येणार आहे.