अफवांच्या बाजारात फिरताना आणखी लोकांचे जीव जाऊ नयेत यासाठी..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

थर्ड अँगल | पालघर येथील ३ व्यक्तींना जमावाने ठेचून मारल्याची घटना ताजी आहे. यामधील २ व्यक्ती साधू होत्या. साधूच्या वेशात काही लोक या भागात चोरी करत असल्याची माहिती मागील आठवडाभर स्थानिक लोकांच्या सोशल मिडियावर फिरत होती. कायदा हातात घेण्यासाठी इच्छुक असलेल्या जमावाने पोलिसांनाही न जुमानता तीन लोकांना काही क्षणातच संपवलं. अफवा किंवा खोटी माहिती पसरवण्याचे तोटे किती भयानक असू शकतात, यावर प्रकाश टाकणारा हा लेख.

समाजातील नेते आणि लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी धोकादायक अफवा रोखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे.

राजीव भार्गव 

१९९४ मध्ये दिल्ली शीख लोकांविरुद्धच्या कार्यक्रमाने व्यापली होती. त्यावेळी शहरात अफवा पसरली होती की शीख लोकांनी शहरातल्या सर्व पाणीपुरवठयांमध्ये विष मिसळले आहे. अशा अफवा नवीन नाहीत. शतकानुशतके युरोपियन यहुद्यांवर विहिरींमध्ये विष मिसळण्याचे, साथीच्या आजाराचे आणि अशांतता पसरवण्याचे खोटे आरोप करण्यात आले आहेत. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात पॅरिस, श्रीमंतांनी गरिबांना प्राणघातक शस्त्रं दिली, दूषित पीठ वाटले या अफवांमुळे वर्गांवर आधारित  खोल ध्रुवीकरणाचा पॅरिस साक्षीदार आहे. या covid-१९ च्या साथीच्या काळातही  मुस्लिम २००० रुपयांच्या नोटांना थुंकी लावून जाणीवपूर्वक रस्त्यावर फेकत आहेत, रस्त्यावरचे मुस्लिम विक्रेते भाजीपाला, फळांवर थुंकत आहेत या अफवा पसरत आहेत यात काही आश्चर्य नाही. सामाजिक ताण किंवा नैसर्गिक आपत्तींचा काळ म्हणजे अफवांसाठी सुपीक मैदानच असते. जे केवळ आग पसरवत नाही तर, सामाजिक बहिष्कार, हिंसा आणि जाळपोळ, जमाव हत्या आणि खुनासारखे गंभीर परिणामही करते. 

अफवांचे शरीरशास्त्र – अफवा कुठून येतात, कशा आणि का पसरतात? का त्या संकटकाळातच विस्तारतात? सगळ्याच अफवा अपायकारक नसतात. काही धोकादायक असण्याचा संभव असतो, पण त्या आकाशातल्या उल्कांसारख्या फारसा परिणाम न करताच अदृश्य होतात.  पण एकदा त्या विषारी आहेत, आपत्तीजनक परिस्थिती निर्माण करू शकतात आणि त्याचे विनाशकारी परिणाम होऊ शकतात हे लक्षात आल्यास काळजी करायला भाग पडतात. अशा अफवा कशा तपासल्या जाऊ शकतात?  सर्वप्रथम अफवा या न तपासलेल्या माहितीचा, अहवालाचा आणि कथेचा एक भाग असतात. म्हणून त्यांची सत्यता संशयास्पद असते. ही न तपासलेली एक संदिग्ध स्थिती आहे जी अफवांना मोठे करते. ज्याक्षणी एखादी गोष्ट सार्वजानिकरित्या  सर्वांसमोर ठेवली जाईल आणि स्वीकारली जाईल, त्यातील सत्य किंवा असत्य तपासले जाईल त्यावेळी या अफवा थांबतील. एका अर्थी अफवांचा परिणाम किंवा प्रभाव हा त्याच्या सत्य किंवा असत्याशी असंबद्ध आहे. अद्याप प्रत्येक खात्री न केलेली गोष्ट अफवा नाही. हे होण्यासाठी इतर वैशिष्ट्यांची पण गरज आहे.
१. प्रथम त्याला सत्याचा परीघ असणे आवश्यक आहे. त्यातील काहीतरी श्रोत्यांसाठी किंवा वाचकांसाठी संदर्भानुसार प्रशंसनीय बनविणे गरजेचे आहे. एखादी गोष्ट खरोखरच विचित्र असू शकते जसे की, सूर्य एका रात्रीत गोठला हे लगेच खोटे ठरते, पण सचिनने एकदिवसीय सामन्यात एक हजार धावा केल्या ही अफवा होऊ शकत नाही.
२. दुसरे त्याच्या अयोग्य कारणामुळे. पीडितांच्या सामूहिक मनावर ताबा मिळविल्यामूळे त्या सर्वत्र वेढा घालतात.
३. अचानक अनेकजण विश्वास ठेवण्यास सुरुवात करतात. हे सुद्धा एक आगाऊ तिसरे वैशिट्य आहे की अफवा खूप लवकर पसरते.
४. चौथे एखाद्या कार्यक्रमातून ती आपोआप तयार होते. कधीकधी जसे एखादे तुफान त्याच्या पानांचा विध्वंस करते तशी ही पुढे जात राहते पण ती अल्पकालीन असते.
५. पाचवे काहींनी जाणीवपूर्वक ही रुजविली असेल तरी ती मोठ्या जमावापासून पसरते. खरोखरंच तिच्या भुरळ पडणाऱ्या शक्तींविरुद्ध तज्ञ अधिकारीही असहाय असतात.

तर अफवा हे मजबूत भावनात्मकतेचे, मोठ्या आवाजाचे, अर्धसत्य आहे, जे लवकर पसरते. अहंकार उत्पन्न करण्यासाठी आणि त्याची एजन्सी करण्यासाठी ते वैयक्तिकरित्या प्रभाव पाडते. ज्यामुळे गंभीर सामाजिक परिणाम होऊ शकतात. अफवा समाजात इतक्या प्रभावी असतात की, समाज त्यांना घेण्यासाठी तयारच असतो. मग त्यांना जन्म देण्याच्या परिस्थिती काय असतात? पहिला संदर्भ म्हणजे एकत्र काहीच माहिती नसते किंवा खूप जास्त माहिती असते. त्यांच्या या अनिश्चित संदर्भाच्या जगात मनुष्य आकलनदृष्ट्या अस्थिर आणि चिंताग्रस्त बनतो आणि समाधानकारक अर्थ लावण्यास असमर्थ ठरतो. त्यांना उपलब्ध माहितीच्या तुकड्यांवरच अवलंबून राहण्यास भाग पाडले जाते, अर्धसत्याच्या भागांवर, एका नाजूक संकेतावर, असंघटित चौकट उभी केली जाते ज्यामुळे अफवांच्या आकलनापर्यंत जाता येत नाही. 
अफवा या पौराणिक चौकटींवर वाढतात. या चौकटींमध्ये एखादी भावनिक चिंता जोडली की ती पसरवण्यासाठीचा आराखडा एखाद्याकडे तयारच असतो. त्यामार्गाने येणारे सर्व पुरावे गरम डोक्याने जाळले जातात आणि बऱ्याचदा भावनिक गरजांच्या सेवांमध्ये अफवांना शरण जातात. आठवा, नोटबंदीच्या वेळी स्वतःचे पैसे गमावल्याबद्दल निराशा आणि दुःख असूनही त्या दरम्यान ज्या श्रीमंत लोकांनी आपला काळा पैसा लपवला आहे तो निरुपयोगी होणार आहे या अफवेमध्ये गरीब समाधान शोधत होते. 

ते का पसरवतात – रांची आणि पटना विद्यापीठाचे एक मानसशास्त्रज्ञ जमुना प्रसाद हे पहिले असे व्यक्ती होते, ज्यांनी उच्च पातळीवरील चिंता आणि सहज प्रसार होणाऱ्या अफवांमध्ये दुवा स्थापित केला. जिवंत असताना त्यांना फारसं कुणी ओळखत नव्हतं पण मरणोत्तर ते अफवांच्या सामाजिक मानसशास्त्राचे पहिले संशोधक म्हणून सर्वांना परिचित झाले. त्यांनी १९३४ च्या बिहार आणि नेपाळच्या भूकंपाचा समाजावर झालेला प्राणघातक परिणाम यावर अभ्यास केला होता. इतरांनी दाखविले आहे, तीव्र संकटाच्या वेळी लोक चुकीचे पूर्वग्रह आणि अनुमान लावतात. आधीपासूनच लोकांना आवडत नसणारा आणि अविश्वासू असा एक “बाहेरील” गट सध्याच्या संकटासाठी दोषी ठरवण्यास सोपे लक्ष्य असतो. अफवा समाजात असलेल्या ‘आम्ही आणि ते’ या विकृतीच्या आधीच असलेल्या 
ध्रुवीकरणामुळे पसरल्या जातात. खरोखरच लोकांना एकत्र बांधण्यासाठी, ज्ञात शत्रूविरुद्ध लढण्यासाठी एकता निर्माण करण्यापेक्षा त्या हे ध्रुवीकरण आणखी तीव्र करतात यात काहीच आश्चर्य नाही. त्या अशा लोकांच्या हातून येतात जे या ध्रुवीकरणाचा फायदा घेतात. ज्याने आपत्तीचा आरोप केला आहे अशा शत्रूकडून चुकीच्या गोष्टी केल्या जातात, जिगसॉ कोड्यातील शेवटचा भाग एक ज्वलंत कथा सांगतो की भीती, अनिश्चिततेसह मूलगामी विचार आधीपासून दृढ असतात. अफवा ही ती गोष्ट आहे. तिचा भावनिक अनुनाद आणि वेगाने होणारा प्रसार ही या कथेची खूप घृणास्पद, अपमानास्पद आणि भयानक बाजू आहे. पण नमूद केल्याप्रमाणे, तिची सुरुवात करण्यासाठी तिच्यावर लोकांचा आधीपासूनच विश्वास असणे आवश्यक आहे. तिचा सत्याभास होण्यासाठी त्यात थोडे वास्तविक तपशील जोडणे गरजेचे असते, नाहीतर ती फसते. १९९४ मध्ये झालेल्या हत्याकांडाने शिखांना मोठ्या संख्येने गुरुद्वारामध्ये जाण्यास सक्ती केली. पण त्यानंतर ते शस्त्रास्त्रे साठवत आहेत, हल्ला करण्याचे नियोजन करत आहेत आणि सुखसोयींनी युक्त गल्ल्यांमध्ये लूट करणार असल्याच्या निराधार अफवा समोर आल्या. खरं तर सत्य अगदी वेगळे होते, ते आश्रय शोधण्यासाठी तिथे गेले होते. या संपूर्ण घटनेत एका गोष्टीचा तपशील खरा होता. या एकमेव छोट्या सत्यामुळे संपूर्ण खोट्या गोष्टी वाजवी झाल्या.

त्याचप्रमाणे समकालीन भारतात, अनेक मुस्लिमांना अनियंत्रित हिंसा, कलंक आणि निर्भत्सनाचा अनुभव आला आहे. त्यामुळे या धोक्यामुळे घाबरलेल्या मुस्लिमांनी इंदोरमध्ये त्यांची covid-१९ ची तपासणी करण्यास आलेल्या डॉक्टरांच्या समूहाला मारहाण केली. हे वैद्यकीय अलगीकरण नाही तर अनावश्यक आणि द्वेषभावनेने त्यांच्या कुटुंबियांना वेगळे करण्यासाठी हे लोक आले आहेत, या अफवेला ते लोक बळी पडले. ध्रुवीकरण झालेल्या समाजात भीती आणि असुरक्षेमुळे अफवा लवकर पसरतात. पण मोठ्या प्रमाणात का व्यापतात याचीही काही कारणे आहेत.

१. पहिले मनाला प्रश्न विचारताना काहीतरी चांगले मिळण्याची इच्छा असणे. टिकून राहण्यासाठी  चेहरा लपवण्यापेक्षा  किंवा समाज बहिष्कृत होण्यापेक्षा लोकांना त्यांच्या समूहाच्या सदस्यांचे अनुकरण करणे जास्त सुरक्षित वाटते.

२. दुसरे, गंमत म्हणजे एकसारखी (एकसारख्या विचारांची) माणसे जेव्हा आपापसांत चर्चा करतात, तेव्हा ती जास्त आत्मसात केली जाते. चर्चेचा प्रभाव धबधब्यासारखा असतो, जेवढे लोक त्यावर बोलतात तेवढी अफवा पसरत जाते.

३. तिसरे, बाहेरच्या अविश्वासू व्यक्तीला नकार देणे, ती व्यक्ती कितीही तज्ञ असली तरी याचा शेवट केवळ अफवा आणखी मजबूत होऊन होतो. ध्रुवीकरण झालेल्या समाजामध्ये ते त्यांच्या तर्कशास्त्रानुसार काम करतात. प्रत्येक व्यक्ती कट्टर असते. निःपक्षपाती लोकांच्या आवाजासाठी एखादे तटस्थ मैदान हे अकल्पनीय आहे. 

अनियंत्रित प्राणघातकपणा – अफवा तीव्र संकटकाळात पसरतात आणि त्या अपरिहार्य असतात. समाजाला पूर्ण माहिती आणि सुरक्षा कधीच दिली जाऊ शकत नाही. थोडक्यात इथेच खरी कठीण समस्या आहे आणि हाच धोका आहे. तरीही तार्किक खंडन करणे किंवा संबंधित माहिती आणखी रंगवण्यापासून थांबवणे अक्षम आहे. मग आपण असहाय होण्यापूर्वी काही अफवा या त्सुनामीसारख्या पसरतील? हा अनियंत्रित प्राणघातकपणा आहे. परिस्थिती हितकारकतेतून अफवांमध्ये बदलल्यास त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते. समाजाचे एकत्रीकरण करणे, समाजातील पूर्वग्रह दूर करणे आणि सामूहिक शांतता संबोधणे आणि समूहाला व्यापणे हे प्रतिबंधक आहेत, पण केवळ दीर्घ कालावधीसाठी. थोडक्यात अफवा तपासण्यासाठी नियामक कायदे आवश्यक आहेत. तसेच जे समाजातले टीकाकुशल आहेत त्यांनी या अफवांना नकार देण्याची, किमान शेवटी त्यांनी कुणाला इजा होणार नाही, अगदी त्याचा प्रचार करणाऱ्यांनाही याची गरज आहे. त्याचा प्रसार करणे आणि अफवांचे  शोषण करणे आवश्यक आहे. समाजातील नेते आणि लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी धोकादायक अफवा रोखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे.

राजीव भार्गव हे विकसनशील अभ्यास केंद्र, दिल्ली येथे प्राध्यापक आहेत. या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे.

Leave a Comment