विमानतळावर बाँबच्या अफवेने प्रवाशांसह कर्मचारी भयभीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद : विमानतळावर बाँब असल्याच्या फोने विमानतळावर त्यांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची धावपळ उडाली. ही घटना गुरुवारी सकाळी घडली. एक तासाच्या परिश्रमानंतर बाँब शोधून निकामी केल्यानंतर हे ड्रिल असल्याचे समजतात येथील सुरक्षा यंत्रणेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

विमानतळावर बाँब असल्यास प्रवाशांचा जीव वाचवत त्याला निकामी करण्यासाठी तेथील सुरक्षा यंत्रणा किती सक्षम आहे याची पाहणी करण्यासाठी विमानतळावर गुरुवारी मॉक ड्रिल घेण्यात आली. सकाळी 10:20 च्या सुमारास विमानतळ अधिकाऱ्यांनी विमानतळावरील प्रवासी तपासणी पॉईंट वर्क असल्याचा फोन केला याची माहिती तेथील सुरक्षा यंत्रणेला दिली.

माहिती मिळताच श्वानपथक, अग्निशमन दल, क्यूआरटी टीम, रुग्णवाहिका, स्थानिक पोलिस, विमान कंपन्या आणि प्रशासनातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. श्वानपथक आणि विमानतळावर असलेला बाँब शोधून काढला त्यानंतर त्याला बीडीडीएस या पथकाने निकामी केले. तब्बल एक ते सव्वा तास चाललेली ही कसरत 11: 30 च्या दरम्यान संपली. हा बाँब नसून मॉक ड्रिल आहे हे समजताच प्रवाशांसह विमानतळावरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.

Leave a Comment