सांगलीत बॉम्ब सापडल्याच्या अफवेने उडाली खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी  | प्रथमेश गोंधळे
     शहरात बॉम्ब सापडल्याचा अफवेने एकच खळबळ उडाली. महावीरनगर मध्ये बेवारस सुटकेस मध्ये बॉम्ब असल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली. याची कल्पना सांगली शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी बॉम्ब शोधक पथकाला याची कल्पना दिली. बॉम्बशोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी श्वान पथकाच्या मदतीने ती सुटकेस निकामी केल्यानंतर त्या बागेमध्ये काहीच हाथी लागले नाही. परिणामी पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली होती.
       हाती आलेल्या माहितीनुसार महावीरनगर च्या मामासाहेब नागरी पतसंस्थेजवळ आज सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास बेवारस सुटकेस नागरिकांना आढळून आली. भयभीत झालेल्या नागरिकांनी याची माहिती तातडीने पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर सांगली शहर पोलिस आणि बॉम्बशोधक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळेत सांगली मध्ये बॉम्ब सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. बॉम्ब शोधक पथकाने श्वानच्या मदतीने बेवारस सुटकेसची पाहणी केली.
          त्यानंतर ती सुटकेस उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये काहीच आढळले नाही. सुटकेस मध्ये बॉम्ब नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांसह नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला, मात्र सध्या अतिरेकी कारवाई आणि देशामध्ये असलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर या परिसरात नागरिकांसह बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान सध्य परिस्थिती पाहता नागरिकांना शहरात कोठेही बेवारस वस्तू अथवा संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्यास तातडीने पोलिसांशी अथवा नियंत्रण कक्षाशी संपर साधण्याचे आवाहन सांगली पोलीस दलाच्यावतीने करण्यात आलं आहे.

Leave a Comment