अति घाई संकटात नेई !! एकाच दिशेला धावले दोन्ही फलंदाज,अन….

Runout
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात महत्वपूर्ण सामना सुरू आहे. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी हे दोघे पंजाबच्या संघाकडून सलामीला उतरले.मागच्या सामन्यातील सामनावीर राहुल त्रिपाठी आज लवकर बाद झाला.

त्रिपाठी बाद झाल्यावर नितीश राणा मैदानात आला. तो आणि शुबमन गिल चांगली भागीदारी करणार असं वाटत असतानाच मैदानात प्रचंड गोंधळ दिसून आला. अर्शदीपच्या गोलंदाजीवर शुबमन गिलने चेंडूला दिशा दिली आणि एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. समोरून नितीश राणा धावत आला पण गिलने मात्र मन बदलत धाव घेण्यास नकार दिला. फिल्डरने फेकलेला चेंडू स्टंपवर लागला नव्हता, पण दोघेही फलंदाज एकाच दिशेने धावले. त्यामुळे दुसऱ्या ठिकाणी कोणीच फलंदाज उरला नाही. अशा परिस्थितीत पूरनने अतिशय शांतपणे राणाला धावबाद केलं.

दरम्यान, पंजाब साठी आजचा सामना खूप महत्वपूर्ण असून आज जर त्यांचा पराभव झाला तर मात्र प्ले ऑफ साठी त्यांचं स्थान धोक्यात येईल आणि ते आयपीएल मधूनही बाहेर पडू शकतील. कोलकाता आणि पंजाब या संघांमध्ये प्रत्येकी एक-एक बदल करण्यात आला. शेल्डन कॉट्रेल दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी संघात ख्रिस जॉर्डनला संधी देण्यात आली. तर कोलकाताच्या संघानेही वेगवान गोलंदाजाला संधी दिली. त्यांनी शिवम मावीच्या जागी प्रसिध कृष्णाला संघात जागा दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’