फडणवीसांच्या ‘दिशाहीन अभ्यासामुळे’ राज्यात पूरपरिस्थिती; राष्ट्रवादीचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भावर आलेल्या पूरस्थितीला जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे असा आरोप पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला मराठवाड्याच्या अनेक भागांत आलेल्या पुरास अशास्त्रीय पद्धतीनं राबवली गेलेली जलयुक्त शिवार योजना कारणीभूत आहे,’ असे ते म्हणाले. यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दिशाहीन अभ्यासामुळे’ राज्यातील पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या बाबतीत तज्ज्ञांनी अगोदरच सांगितले सुद्धा होते. मात्र ‘मीच तो सर्वज्ञ’ अशा स्वभावामुळे राज्यातील हे संकट निर्माण झालं आहे. कोणतेही काम करताना आजच्या सोबतच भविष्याचा विचार करणे महत्वपूर्ण असते. असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.

पर्यावरण तज्ञ अतुल देऊळगावकर नेमकं काय म्हणले-

जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामं करताना नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचं रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणं हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारं होतं. त्याच वेळेला महाराष्ट्रातील नामवंत जलतज्ज्ञ पोपटराव पवार, विजय बोराडे, प्रदीप पुरंदरे या सर्वांनी सांगितलं होतं की तुम्ही नदीशी छेडछाड करू नका. आता त्याची फळं आपण भोगत आहे अस अतुल देऊळगावकर यांनी म्हंटल.

Leave a Comment