एकरकमी एफआरपी देणे ही शेतकर्‍यांवर मेहरबानी नव्हे, तर आमचे कर्तव्यच आहे – हसन मुश्रीफ 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, नुकसान भरपाई आणि एफआरपीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य व केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी एफआरपीचा मुद्दा शेट्टी यांनी उचलू धरला आहे. त्यांच्यानंतर आता  ग्रामविकासमंत्री व सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे संस्थापक हसन मुश्रीफ यांनी एफआरपी प्रशांवर विधान केले आहे. प्रत्युत्तर दिले आहे. ‘एकरकमी एफआरपी देणे ही शेतकर्‍यांवर मेहरबानी नव्हे, तर आमचे कर्तव्यच आहे, असे मुश्रीफ यांनी म्हंटले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मा बेलेवाडी येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सातव्या गळीत हंगामास प्रारंभ झाला. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकरकमी एफआरपी 2 हजार 960 रुपये देण्यात येणार असून कारखान्याच्या कामगारांना येत्या एक जानेवारीपासून वेजबोर्डही लागू करणार असल्याची घोषणा केली.

यावेळी मुश्रीफ म्हणाले की, एकरकमी एफआरपी देण्यासाठी कोणीही टिमकी वाजवण्याची गरज नसल्याचे मुश्रीफ यांनी म्हंटले आहे. येत्या एक-दोन वर्षातच घोरपडे कारखान्याची गाळप क्षमता 10 हजार टन, 50 मेगावॅट वीजनिर्मिती व दररोज 1 लाख लिटर इथेनॉल निर्मिती अशी विस्तारवाढ करणार आहे.

Leave a Comment