मुंबईतील वाशी टोल नाक्यावर भीषण अपघात! डंपरची 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर रविवारी दुपारी एक विचित्र अपघात (accident) घडला. या अपघातात (accident) एका भरधाव डंपरने 10 ते 12 वाहनांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातात (accident) एका कारमधील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

या अपघातातील (accident) जखमी व्यक्तींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर या धडकेने वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशी टोल नाका म्हटलं की वाहनांची संख्या लक्षणीय. याच वाशी टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी अनेक गाड्या रांगेत उभ्या असताना इतक्यातच अचानक एका भरधाव डंपर ने जवळपास दहा ते बारा वाहनांना जोरदार धडक दिली सदरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाली आहे.

सध्या या डंपरचा चालक फरार असून प्राथमिक माहितीनुसार डंपरचा ब्रेक अचानक निकामी झाल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात (accident) झाला. सध्या घटनास्थळी वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण दाखल झाले आहेत. आणि पुढील तपासाला सुरुवात केली आहे. चौकशीनंतरच हा अपघात नक्की कसा झाला हे समजेल असे पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांनी म्हटले आहे.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!
येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर
सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक
2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!
संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?