संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशियाचा भारताला पाठिंबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । चीनच्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये स्थायी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दर्शविला आहे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्यत्व मिळण्यासाठी भारताला पाठिंबा दर्शविला आहे. रशियाने यापूर्वीच सुरक्षा परिषदेत कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दर्शविला होता. रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा भारत आणि चीन सीमेवर तणाव आहे. दोघांच्या सीमेवरचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, ”आज आम्ही संयुक्त राष्ट्रांच्या संभाव्य सुधारणांविषयी बोललो आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचा कायमस्वरुपी सदस्य होण्यासाठी भारत एक प्रबळ उमेदवार असून आम्ही भारताच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शविला आहे. आमचा विश्वास आहे की भारत सुरक्षा परिषदेचा संपूर्ण सदस्य बनू शकतो असा विश्वास लावरोव्ह यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, मला वाटत नाही की भारत आणि चीनला बाहेरून कोणत्याही मदतीची गरज आहे. मला वाटत नाही की त्यांना मदतीची गरज आहे, विशेषत: जेव्हा हे प्रकरण देशाच्या प्रश्नांशी संबंधित असेल. ते स्वत: हून ते सोडवू शकतात.”

आरआयसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, नवी दिल्ली आणि बीजिंग यांनी शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढण्यासाठी आपली वचनबद्धता दर्शविली आहे. त्यांनी संरक्षण अधिकारी, परराष्ट्रमंत्री या पातळीवर बैठकांना सुरुवात केली. या बैठकीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हे देखील उपस्थित होते. गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) च्या कायमस्वरुपी सदस्यत्वाच्या भारताच्या दाव्याला पुन्हा पाठिंबा दर्शविला. ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ फैरेल म्हणाले की, “आम्ही युएन सुरक्षा परिषदेत भारताच्या कायम सदस्यत्वाचे समर्थन केले आहे.” ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) च्या कार्यकारी अध्यक्षाच्या रुपात भारताच्या स्थितीला महत्त्वपर्ण आणि सकारात्मकपणे पाहतो.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment