Russia Ukraine Crisis : रशियाच्या मॉस्को एक्सचेंजकडून सर्वप्रकारचे ट्रेडिंग स्थगित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । रशियाच्या मॉस्को स्टॉक एक्सचेंजने गुरुवारी सांगितले की,” रशियाने युक्रेनवर संपूर्ण आक्रमण सुरू केल्यामुळे त्याने आपले सर्व ट्रेडिंग स्थगित केले आहेत.” आपल्या वेबसाइटवर एका छोट्या प्रकाशनात, एक्सचेंजने म्हटले आहे की, “मॉस्को एक्सचेंजने पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व ट्रेडिंग स्थगित केले आहेत.”

बुधवारी बाजारात फादरलँड डे 2022 च्या सुट्टीमुळे ट्रेडिंग होऊ शकले नाही. आपल्या प्रकाशनात, एक्सचेंजने म्हटले आहे की, “23 फेब्रुवारी आणि 8 मार्च, 2022 रोजी, त्या दिवशी ट्रेडिंग करणार्‍या सर्व सिक्युरिटीजचे स्वतःचे स्टॅण्डर्ड इंडीकेटर्स असतील – क्लोजिंग प्राईस, एडमिडेड कोट्स आणि मार्केट प्राइस यासह – सध्याच्या पद्धतीनुसार कॅल्क्युलेट केले जाईल आणि त्यानुसार डिस्क्लोज केले जाईल.

रशियन बाजारात प्रचंड विक्री होत असताना आणि मोठी घसरण होत असताना एक्सचेंजकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांचा परिणाम रशियन बँका आणि कर्जबाजारी श्रीमंत लोकांवरही झाला.

अमेरिकेपासून ते जर्मनीपर्यंत सर्वांनी रशियावर निर्बंध लादले
युनायटेड स्टेट्सने म्हटले आहे की, ते रशियन गवर्नमेंट डेट (Russian government debt) ट्रेडिंगवरील निर्बंध कडक करत आहेत. ब्रिटनने 5 रशियन बँकांवर आणि तीन अब्जाधीशांवर निर्बंध लादले आहेत. जपानने देशांतर्गत रशियन बॉन्ड इश्यू करण्यावर बंदी घातली आहे, तसेच काही रशियन व्यक्तींची मालमत्ता फ्रीज़ केली आहे.

याशिवाय जर्मनीने रशियाकडून नॉर्ड स्ट्रीम 2 गॅस पाइपलाइनचे सर्टीफिकेशन स्थगित करत असल्याचेही जाहीर केले. असे मानले जात होते की, रशियन-समर्थित फुटीरतावाद्यांना लष्करी समर्थन देण्यासाठी आणि दोन युक्रेनियन प्रदेशांना स्वतंत्र म्हणून मान्यता देण्याच्या रशियन हालचालींमुळे अधिक निर्बंध येऊ शकतात.

भारत रशियाकडून फक्त 1% कच्चे तेल घेतो
रशिया हा तिसरा सर्वात मोठा देश आहे, जो दररोज सुमारे 5 मिलियन बॅरल कच्च्या तेलाची निर्यात करतो, त्यापैकी निम्म्याहून अधिक युरोप आणि 42 टक्के आशियामध्ये जातो. भारत रशियन क्रूड निर्यातीपैकी 1 टक्काही खरेदी करत नाही, कारण बहुतेक भारतीय रिफायनरीज रशिया निर्यात करत असलेल्या जड क्रूडवर प्रक्रिया करू शकत नाहीत. याव्यतिरिक्त, दोन्ही देशांदरम्यान पाइपलाइनची कमतरता आहे, ज्यामुळे वाहतूक खर्च जास्त आहे. संरक्षण क्षेत्रात रशिया आणि भारत एकमेकांच्या अगदी जवळ आहे.

Leave a Comment