Sunday, June 4, 2023

पुतीन यांना जिवंत अथवा मृत पकडून आणल्यास …; पहा कोणी दिली सुपारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रशिया आणि युक्रेन मध्ये सध्या जोरदार युद्ध सुरु असतानाच एका रशियन उद्योगपतीच्या पोस्टने खळबळ उडाली आहे .रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांना जिवंत अथवा मृत अवस्थेत आपल्या समोर आणणाऱ्यास साडेसात कोटींचे बक्षीस देऊ, अशी ऑफर अ‍ॅलेक्स कोनानिखिन या उद्योजकाने दिली आहे. याबाबत अॅलेक्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या व्हायरल होत आहे.

अॅलेक्स कोनानीखिन यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये व्लादिमीर पुतिन यांचा फोटोही आहे, ज्यामध्ये मृत की जिवंत असे लिहिले आहे. व्यावसायिकाने आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले की, ‘मी वचन देतो की जो कोणी आपले घटनात्मक कर्तव्य बजावेल आणि पुतीनला रशियन आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युद्ध गुन्हेगार म्हणून अटक करेल, त्याला मी $ 1,000,000 देईन’.

पुतीन हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष नाहीत, असे अॅलेक्सने लिंक्डइनवर लिहिलेल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे. त्यांनी विशेष ऑपरेशनचा भाग म्हणून रशियामधील अनेक अपार्टमेंट्स, इमारती उडवून दिल्या. यानंतर त्यांनी निवडणुका न घेत संविधान फोडण्यात आले. पुतीन यांनी आपल्या विरोधकांना मारले. रशियाचा नागरिक या नात्याने, नाझीवाद आणि त्याच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी रशियाला मदत करणे हे माझे नैतिक कर्तव्य आहे असे अॅलेक्सने लिंक्डइनवर यांनी म्हंटल