औरंगाबाद : शहरात आतापर्यंत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसीचा वापर करणे सुरू आहे. या दोन भारतीय लसीचा वापर करून शहरासह जिल्ह्यात लसीकरण केले जात आहे. मात्र, आता लवकरच शहरात रशियाची स्पुटनिक व्ही ही लस दाखल होणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी शहरात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, शहरातील सिग्मा हॉस्पिटलने स्पुटनिक व्ही लसींची ऑर्डर दिली आहे. येत्या आठवड्याभरात या लसींचा साठा उपलब्ध होणार आहे. 16 जानेवारीपासूनच लसीकरणाला सुरवात झाली. देशात आता रशियाच्या स्पुटनिक व्ही लससह काही लसींना परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात ही स्पुटनिक व्ही लस उपलब्ध होणार आहे.
हैदराबादच्या कंपनीकडून सिग्मा हॉस्पिटलने स्पुटनिक व्ही लसींची मागणी नोंदवली आहे. कंपनीने या संबंधित ऑर्डर घेऊन यावर कारवाही सुरू केली आहे. आठवड्याभरात ही लस उपलब्ध होणार असून लवकरच लसीकरण सुरू केले जाणार आहे. स्पुटनिक व्ही लसीचे दोन डोस असून याची किंमत किती असेल हे अजून स्पष्ट झालेले नाही.