Russian Plane Missing : मोठी बातमी!! विमान हवेतच झालं बेपत्ता; 50 प्रवाशांचा जीव संकटात

Russian Plane Missing
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Russian Plane Missing मागच्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. अहमदाबाद येथील विमान अपघातांनंतर कुठ ना कुठे विमानातील तांत्रिक बिघाड समोर येत आहेत. विमानाच्या इंजिनला आग लागल्याच्या किंवा टायर फुटल्याचा घटना घडू लागल्यात. आता तर थेट रशियामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ५० प्रवाशांना घेऊन उड्डाण केलेलं एक विमान गायब झालं आहे. या विमानाचा संपर्क तुटला असून एका मोठ्या अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.

कुठे निघाले होते विमान – Russian Plane Missing

रशियाच्या राज्य वृत्तसंस्था TASS ने दिलेल्या वृत्तानुसार, या विमानाचे नाव An-24 असं आहे. यातून जवळपास ५० प्रवासी प्रवास करत होते. अंगारा एअरलाइन्सच्या या विमानाने टिंडासाठी उड्डाण केले होते परंतु ते डेस्टिनेशन वर पोहोचण्यापूर्वीच त्याचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. जेव्हा या विमानाशी शेवटचा संपर्क साधला गेला तेव्हा ते टिंड विमानतळापासून काही किलोमीटर अंतरावर होते. तेव्हापासून त्याचा कोणताही पत्ता लागलेला नाही. खरं तर हा परिसर चीनच्या सीमेजवळ आहे आणि या भागातील हवामान जवळजवळ नेहमीच खूप खराब असते, ज्यामुळे विमानांना उड्डाण करणे खूप आव्हानात्मक बनते. त्यामुळे मोठी दुर्घटना तर झाली नाहीयेना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

प्रवासी विमान बेपत्ता झाल्याचे समजताच स्थानिक प्रशासन आणि विमान वाहतूक प्राधिकरणाने तातडीने शोध मोहीम सुरू केली. जंगले आणि डोंगराळ भागात बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. ज्या प्रदेशात विमान बेपत्ता झाले आहे तो डोंगराळ भाग आहे, त्याठिकाणी घनदाट जंगले आहेत. सदर भागात खूप थंडीचे वातावरण असल्याने हवामानाच्या दृष्टीने सुद्धा हा एक आव्हानात्मक मार्ग आहे. त्यामुळे विमान क्रॅश (Russian Plane Missing) तर झालं नाही ना अशी भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, त्याच अमूर प्रदेशात तीन जणांसह रॉबिन्सन R66 हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. हा प्रदेश मॉस्कोपासून अंदाजे ६,६०० किमी पूर्वेला आहे.