Big Breaking | रशियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था । रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशस्टीन यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः मिशस्टीन यांनी अध्यक्ष व्लेदमीर पुतीन यांच्यासोबतच्या एका टेलिव्हिजन कार्यक्रमादरम्यान याबाबत खुलासा केला आहे. तसेच आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होत असून पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्याने आयसोलेशन मध्ये राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जानेवारी महिन्यातच मिशस्टीन यांची पंतप्रधानपदी निवड करण्यात आली होती. रशियातील कोरोना विरुद्धच्या लढ्याचे ते नेतृत्व करत होते. मात्र आता खुद्द पंतप्रधानानांच कोरोनाची लागण झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. उपपंतप्रधान आंद्रेइ बेलोसोव्ह हे आता पंतप्रधान म्हणून कामकाज पाहणार असून याला अध्यक्ष पुतीन यांनी परवानगी दिली आहे.

रशियात मागील २४ तासांत एकूण ७०९९ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. रशियातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या १ लाखांहून अधिक असल्याची माहिती आहे.

You might also like