हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने आज विश्वविक्रम केला आहे. ऋतुराज गायकवाडने एकाच ओव्हर मध्ये 7 चेंडूत 7 षटकार मारले आहेत. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्धच्या सामन्यात गायकवाडने हा कारनामा केला आहे. यासोबतच ऋतुराजने 159 चेंडूत 220 धावा केल्या. ऋतुराजच्या या दमदार खेळीमुळे महाराष्ट्राच्या संघाने ५० षटकात ५ बाद ३३० धावा केल्या. ऋतुराज गायकवाड व्यतिरिक्त, या सामन्यात महाराष्ट्राचे इतर फलंदाज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. गायकवाडनंतर अजीम काझी आणि अंकित बावणे यांनी प्रत्येकी ३७-३७ धावांचे योगदान दिले
ऋतुराज गायकवाडने हा भीमपराक्रम डावाच्या ४९ व्या षटकात केला आहे. उत्तरप्रदेशचा गोलंदाज शिवा सिंगच्या या षटकात एक चेंडू नो बॉल होता. त्यामुळे हे षटक सात चेंडूंचे झाले. या ७ चेंडूत गायकवाडने ७ गगनचुंबी षटकार ठोकले आणि या ओव्हर मध्ये तब्बल 43 धावा कुठल्या. ऋतुराज गायकवाडने आपल्या खेळीदरम्यान 159 चेंडूत 220 धावा केल्या. यामध्ये 10 चौकार आणि 16 षटकारचा समावेश आहे.
https://twitter.com/Harsha_offll2/status/1597135035660120064?s=20&t=EhC2myCpoH7NVdHJ1p4BNg
दरम्यान, एका षटकात ४३ धावा केल्याची लिस्ट ए क्रिकेटमधली ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2018-19 मध्ये न्यूझीलंडच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये असे घडले होते. सेंट्रल डिस्ट्रिक्टचा गोलंदाज विलेम लुडिकने एका षटकात ४३ धावा दिल्या. त्या षटकात लुडिकने दोन नो-बॉल टाकले आणि नॉर्दर्न डिस्ट्रिक्टचे फलंदाज जो कार्टर आणि ब्रेट हॅम्प्टन यांनी मिळून सहा षटकार ठोकले होते.