वाई प्रतिनिधी | पीपीई किट घालून रुग्णसेवा बजावणे अतिशय अवघड काम आहे. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी सलग पाच- सहा तास किट्स घालून करोनाबाधित रुग्णावर उपचार करीत आहेत. या डॉक्टरांचे योगदान अमूल्य असल्याचे मत सातारच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी व्यक्त केले.
वाई पोलीस ठाण्यातील पंधरा पोलीस कर्मचारी करोनाबाधित आढळल्याने जिल्हा पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ताबडतोबीने वाईला भेट दिली. उपचार सुरु असणाऱ्या संचित आयसीयू बी विंग रुग्णालयात जाऊन कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेतली व त्यांच्या आरोग्याविषयी माहिती घेतली. यातील काही कर्मचाऱ्यांचे कुटुंबियही बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे कर्मचारी चिंता व्यक्त करत असताना संबंधित कर्मचारी रुग्णांना तुम्ही काळजी करु नका तुम्ही लवकरच ठणठणीत व्हाल तसेच तुमच्या कुटुंबियांसमवेत आम्ही आहाेत, काळजी करू नका असा दिलासा दिला. यावेळी सुरक्षिततेसाठी त्यांनी पीपीई किट परिधान केले होते.
या अनुभवातून त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी करीत असलेली रुग्णसेवा ही निश्चितच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवा देणाऱ्या सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी करीत असलेली रुग्णसेवा ही निश्चितच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे, जिल्ह्यातील सर्व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.