Sachet Loan | Google Pay देणार ‘Sachet Loan’ ? जाणून घ्या कर्जाचा प्रकार आणि फायदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Sachet Loan | आजकाल सगळेच व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच डिजिटल पद्धतीने व्हायला लागलेले आहेत. गुगल इंडिया देखील त्यांचे वेगवेगळे पॅकेज जाहीर करत असते. कर्ज घेण्याची एक नवीन सुविधा गुगल इंडियाने जारी केलेली आहे. याच्या मदतीने आता गुगल पे वरून तुम्ही पंधरा हजार रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकता. आणि हे कर्ज तुम्ही केवळ 11 रुपयांपासून छोट्या हप्त्यांमध्ये देखील परत करू शकता. आता कर्ज घेण्याची ही नक्की कोणती पद्धत आहे? याला सॅशे लोन (Sachet Loan) असे म्हणतात. आता याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया

सॅशे लोन म्हणजे काय ? |Sachet Loan

सॅशे लोन हा एक लहान नॅनो क्रेडिटचा प्रकार आहे. तुम्ही या मार्फत अगदी लहान स्वरूपात कर्ज घेऊ शकता. त्याचा कालावधी देखील खूप कमी असतो. हे कर्ज तुम्हाला 10 हजार रुपयांपासून मिळू शकते. हे करतो तुम्हाला सात महिने ते बारा महिन्यांपर्यंत परत करायचे असते. हे लोन घेण्यासाठी तुम्हाला लोन ॲप डाऊनलोड करावे लागेल. किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून देखील तुम्हाला हे लोन मिळू शकते.

गुगल पेने देखील आता स्वतःचे लोन जारी केलेले आहे. याबाबत त्यांनी एक्सवर देखील पोस्ट शेअर करून माहिती दिलेली आहे. हे लोन आता भारतात लॉन्च केलेले आहे. त्यांनी सांगितले आहे की, “व्यापाऱ्यांसोबतच्या आमच्या अनुभवाने आम्हाला शिकवले की त्यांना अनेकदा लहान कर्ज आणि अधिक सोयीस्कर परतफेड पर्यंतची आवश्यकता असते. आणि त्यांच्या या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही डीएम फायनान्ससोबत भागीदारी केलेली आहे गुगल पेवर 15 हजार रुपयांपर्यंत कमी कर्ज मिळेल आणि तेही तुम्हाला 11 रुपये इतक्या कमी हप्त्यांमध्ये परत करू शकता.”

कशाप्रकारे मिळणार सॅशे लोन ? |Sachet Loan

आता गुगल पेने फेडरल, कोटक महिंद्रा, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसह या चार बँकांची भागीदारी केलेली आहे. ही सेवा गुगल पेद्वारे फक्त टीयर दोन शहरांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आता या कर्जासाठी कसा अर्ज करायचा हे आपण जाणून घेऊया.

सॅशे लोन कसे घ्यायचे ?

  • हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी गुगल पेपर बिझनेस हे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्ही कर्ज या विभागात जाऊन ऑफर्स टॅबवर क्लिक करा.
  • कर्जाची रक्कम भरल्यानंतर तुम्ही तुमच्या साइटवर तरी डायरेक्ट केले जाईल.
  • त्यानंतर तुमची केवायसी होईल आणि काही सोप्या स्टेप केल्यानंतर तुम्हाला कर्ज मिळेल