संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा; सचिन खरात यांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना म्हणजे थोतांड आहे, वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरून मंदिराची कुलुपे तोडायला हवीत, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करा” अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली.

संभाजी भिडे हे महाविकासआघाडी सरकार आल्यापासून समाजव्यवस्था बिघडेल अशी वक्तवे करत आहे. आता तर भिडे म्हणतात कोरोना थोतांड आहे मंदिराचे कुलूप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरा असे चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे भिडे यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल करून महाराष्ट्र राज्यातून तडीपार करावे अशी मागणी सचिन खरात यांनी केली

संंभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे”, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) म्हणाले. इतकंच नाही तर वारकरी रस्त्यावर उतरले पाहिजेत, मंदिराची कुलुपे तोडायला हवीत, असंही संभाजी भिडे म्हणाले.

Leave a Comment