‘दुर्योधन’ अन् ‘दु:शासन’ च्या वस्त्रहरणातून सध्याचे सरकार अस्तित्वात आलेय; काँग्रेसची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नव्याने अस्तित्वात आलेल्या शिंदे – फडणवीस सरकारवर ‘मविआ’ कडून निशाणा साधला जाऊ लागला आहे. दरम्यान आज काँग्रेसकडून शिंदे व फडणवीस सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी ट्विट केले असून त्यामधून त्यांनी ‘दुर्योधन’ व ‘दु:शासन’ च्या सरकारने मिळून केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात आले आहे, अशी टीका केली आहे.

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटरमध्ये म्हंटले आहे की, ‘दुर्योधन’ म्हणजे वाईट मार्गाने मिळवलेले धन व ‘दु:शासन’ म्हणजेच मोदी सरकारच्या अत्याचारी व कुटील शासन या दोन्हींनी मिळून केलेल्या लोकशाहीच्या वस्त्रहरणातून महाराष्ट्राचे सध्याचे सरकार अस्तित्वात आले आहे, अशी टीका सावंत यांनी केली आहे.

यावेळी सावंत यांनी भाजपला इशाराही दिला आहे. आजच्या विजयामुळे जल्लोष साजरा केला जात आहे. मात्र, कार्यकर्त्यांच्या जल्लोषात जनतेची घृणा वाढत आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा ट्विटच्या माध्यमातून सावंत यांनी दिला आहे.

Leave a Comment