नववर्षानिमित्त सचिननं ट्विटवर शेअर केला दिव्यांग खेळाडूचा प्रेरणादायी व्हिडीओ;नेटकरी भारावले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । नवीन वर्षाच्या सुरुवातीला वेगवेगळे संकल्प लोक करत असतात. हे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाला आवश्यक असलेली प्रेरणा कधी कुटुंबियांकडून, कधी मित्रांकडून तर कधी समाजमाध्यमांवरून मिळत असते. संकल्प तडीस नेण्याच्या दृष्टीनं असाच एक प्रेरणा देणारा विडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने सोशल मीडियावर एक भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हा व्हिडीओ सचिन तेंडुलकरसह नेटकऱ्यांच्या काळजालाच भिडला आहे. या दिव्यांग मुलाचा खेळतानाचा व्हिडीओ ट्विटरवर खुद्द शेअर करत नव्या वर्षाची सुरूवात या प्रेरणादायी व्हिडीओपासून करा, असं आवाहन यावेळी सचिननं केलं आहे. या व्हिडिओतील क्रिकेटवरचे प्रेम आणि खेळण्याची जिद्द प्रत्येकाला नवीन प्रेरणा देणारी असून या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.