…म्हणून भारताचा फायनलमध्ये पराभव झाला; सचिनने सांगितले हे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. न्युझीलंडच्या गोलंदाजी पुढे भारतीय फलंदाजांनी दोन्ही डावात लोटांगण घातले. विराट कोहली आणि भारतीय संघाच्या पदरी पुन्हा एकदा अंतिम सामन्यात निराशा पडली. दरम्यान भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी या पराभवाच कारण सांगितले आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विट करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल जिंकणाऱ्या न्यूझीलंड संघाचे अभिनंदन केलं. भारतीय संघ त्यांच्या कामगिरीने निराश झाला असेल. मी आधीच सांगितले होते की सहाव्या दिवसाची पहिली १० षटकं अत्यंत महत्त्वाची आहेत आणि भारतानं दहा चेंडूंत विराट व पुजारा या दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या आणि त्यामुळे संघावर प्रचंड दडपण वाढलं असे सचिनने म्हंटल.

दरम्यान या सामन्यात भारताचा पहिला डाव २१७ धावांवर गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडनं पहिल्या डावात २४९ धावा करून ३२ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर कायले जेमिन्सननं दुसऱ्या डावात टीम इंडियाला जोरदार झटके दिले. भारताचा दुसरा डाव १७० धावांत गुंडाळून न्यूझीलंडनं १३९ धावांचे लक्ष्य दोन विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. केन विलियम्सननं नाबाद ५२ आणि रॉस टेलरनं नाबाद ४७ धावा करताना संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

 

Leave a Comment