रोहित-विराटसाठी सचिनची खास पोस्ट!! वाचून तुमचाही ऊर भरून येईल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताला T20 विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली ( Virat Kohli) यांनी आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटला अलविदा केला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारताचे अनमोल रत्न आहेत. एक असे खेळाडू ज्यांनी मागील १५ वर्षात भारतीय क्रिकेटची भरपूर सेवा केली आहे. भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यात या दोन्ही खेळाडूंचा मोठा वाटा राहिला आहे. आज विराट आणि रोहितने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतर भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकला. याच पार्श्वभूमीवर क्रिकेटचा देव आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

सचिन रोहित शर्माबाबत म्हणाला कि, रोहित, एक आश्वासक तरुण ते विश्वचषक विजेत्या कर्णधारापर्यंत तुझ्या उत्क्रांतीचा मी साक्षीदार आहे .क्रिकेट बद्दलची तुझी अतूट बांधिलकी आणि अपवादात्मक प्रतिभेने देशाला मोठा अभिमान मिळवून दिला आहे. T20 विश्वचषकातील विजय हा तुझ्या उत्कृष्ट कारकिर्दीचा परिपूर्ण कळस आहे. शाब्बास, रोहित! पुढे सचिनने विराट कोहलीसाठी सुद्धा म्हंटल कि, विराट तू या खेळाचा खरा चॅम्पियन आहेस . स्पर्धेच्या आधी तुला कदाचित कठीण वेळ गेला असेल, परंतु काल रात्री तू सिद्ध केले की तू खरोखरच सज्जन खेळातील महान खेळाडूंपैकी एक आहात. ६ विश्वचषकांमध्ये भाग घेणे आणि शेवटच्या विश्वचषकात विजय मिळवणे हा मला चांगलाच माहीत असलेला अनुभव आहे. मला आशा आहे की तू खेळाच्या लांब फॉरमॅटमध्ये (कसोटी क्रिकेटमध्ये) भारतासाठी सामने जिंकत राहशील .

तस बघितलं तर रोहित 2007 पासून आणि विराट 2010 पासून भारताच्या T20 संघाचा भाग आहे. दोघांनी या फॉरमॅटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आणि आता भारताला टी-20 चॅम्पियन बनून त्यांच्या करिअरचा शेवट केला. कोहलीने 12 जून 2010 रोजी आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच आपल्या कामगिरीत सातत्य राखणारा कोहली भारताचा नंबर १ चा बॅट्समन ठरला. रोहित, धोनी यांच्यासारखे मोठे फटके मारणं कोहलीला शक्य नसलं तरी आपल्या क्लासीक खेळीच्या जोरावर त्याने भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिलेत.

दुसरीकडे, रोहित शर्मा हा आक्रमक फलंदाज, एकदा जम बसला कि मग सुट्टी नाही… मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू भिरकावण्याची रोहितची क्षमताच त्याला जगातील सर्वात्कृष्ट फलंदाज बनवते. रोहित जेव्हा बॅटिंग करतो त्यावेळी त्याचा खेळ बघणं म्हणजे डोळ्याचं पारणं फिटणारच असतं. रोहित शर्माने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकून आपल्या T20 आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती.आता तर १७ वर्षांनी त्याने स्वतः च्या नेतृत्वाखाली भारताला T20 विश्वचषक चॅम्पियन बनवले आणि चॅम्पियन म्हणूनच निवृत्ती जाहीर केली.