शेतकरी आंदोलनावर सचिन तेंडुलकरचा स्ट्रेट ड्राइव्ह, म्हणाला की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कृषी कायद्यांविरोधात दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. एकीकडे शेतकरी मागे हटण्यास तयार नाहीत, तर दुसऱ्या बाजूला सरकारही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झालेल्या मोठ्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने राजधानी दिल्लीच्या सीमेवरील सुरक्षा आणखी कडक केली आहे. या आंदोलनाला हॉलिवूडची पॉप स्टार रिहाना हिनेही पाठिंबा देत एक ट्विट केलं होत. दरम्यान भारताचा महान क्रिकेटपूट सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा या विषयावर भाष्य केले आहे.

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही. बाह्यशक्ती बघ्याच्या भूमिकेत राहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असे टि्वट सचिन तेंडुलकरने केले आहे. सचिन तेंडुलकरने हे टि्वट करताना #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही दिले आहेत.

काय म्हटले आहे रिहानाने?

रिहाने ट्विटरवर एक बातमी शेअर केली आहे. यात आंदोलनामुळे बंद केलेल्या इंटरनेट सुविधेचाही उल्लेख आहे. यात, शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील अनेक जिल्ह्यांत कशा प्रकारे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली, हेही सांगितले आहे. रिहानाने या न्यूज बरोबर ”यासंदर्भात आपण चर्चा का करत नाही आहोत” कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

You might also like