तो बाहेरचा बॉल जाऊ दे; जुन्या आठवणींना उजाळा देत सचिनच्या गावस्करांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचे दिग्गज माजी खेळाडू आणि लिट्ल मास्टर म्हणून ओळखले जाणारे सुनील गावस्कर यांचा आज वाढदिवस. एकेकाळी बलाढ्य वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांची पिसे काढणाऱ्या गावस्करांनी आज व्हायच्या ७२ व्य वर्षात पदार्पण केले. जगभरातून गावस्करांवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील १ विडिओ शेअर करत गावस्करांना शुभेच्छा दिल्या आहेत . यावेळी सचिनने जुना आठवणींना देखील उजाळा दिला आहे.

सचिन म्हणाला,  मी भारताकडून खेळण्यास सुरुवात केली नव्वदीच्या दशकात आणि लॉर्ड्स मैदानावर मी एका कसोटीत २७ धावांवर बाद झालो होतो. मी एका अशा चेंडूवर बाद झालो जो लाइनमध्ये नव्हता. तो चेंडू खर तर मी सोडून द्यायला हवा होता. पण मी दुसऱ्या स्लिपमध्ये बाद झालो. तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला आणि म्हणाला, तो बाहेरचा बॉल जाऊ दे बॉल बॉडीच्या जवळ घ्या. तेव्ही ती गोष्ट माझ्या लक्षात आली. त्यानंतर मी जेव्हा सराव करायतो तेव्हा यावर काम केले. त्याची मला खुप मदत झाली.

दरम्यान लिटल मास्टर सुनील गावस्कर यांची भारताच्या सार्वकालिन महान खेळाडूंमध्ये गणना होते. सुनील गावस्कर हे 17 वर्षे गावस्कर भारताचे सलामीवीर राहिले. त्याकाळात विना हॅल्मेट क्रिकेट खेळले जात आणि अशातही गावस्करांनी न घाबरता अत्यंत खरनाक गोलंदाजाविरुद्ध धावांचे डोंगर उभे केले. त्यामुळेच निवृत्त होताना गावस्करांच्या नावावर अनेक रेकॉर्ड होते. त्यांनी टेस्टमध्ये सर्वाधिक शतकं (34) आणि धावांचा (10122) रेकॉर्ड बनवला.

Leave a Comment