मनसुख हिरेन आणि सचिन वाझे सीएसएमटीला भेटले होते; सीसीटीव्ही कॅमेऱ्यात खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी आता नवीन माहिती समोर येत आहे. मनसुख हिरेन आणि सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे 17 फेब्रुवारी रोजी सीएसएमटीला जीपीओजवळ भेटल्याची माहिती उघड झाली आहे. यावेळी दोघांनीही दहा मिनिटे चर्चा केली. मात्र, या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात असून त्या अनुषंगाने एनआयए तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सीसीटीव्हीमध्ये सचिन वाझे आपलं कार्यालय असणाऱ्या मुंबई पोलीस मुख्यालयातून मर्सिडीजमधून बाहेर पडताना दिसत आहेत. यानंतर त्यांचं वाहन सीएसएमटीबाहेर सिग्लजवळ उभं असल्याचं दिसलं आहे. सिग्नल सुरु झाल्यानंतर मर्सिडीज त्याच जागी उभी असते आणि वाझेंनी पार्किग लाईट सुरु करुन ठेवलेली असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे.

काही मिनिटांनी मनसुख हिरेन रस्ता ओलांडून येतात आणि मर्सिडीजमध्ये बसतात. यानंतर मर्सिडीज जीपीओच्या समोर उभी असल्याचं दिसत आहे. जवळपास १० मिनिटं तिथे गाडी पार्क होती. यानंतर हिरेन गाडीतून बाहेर पडतात आणि गाडी पुन्हा पोलीस मुख्यालयात प्रवेश करताना दिसत आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment