सचिन वाझेचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; राजकारणात खळबळ, चर्चा मात्र टायमिंगची

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा खळबळजनक आरोप मुख्य आरोप सचिन वाझे (Sachin Vaze) याने केला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे हे आरोप यावेळी करण्यात आलेत जेव्हा अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस हे या संपूर्ण प्रकरणावर एकमेकांवर आरोप करत आहेत. त्याच दरम्यान आता सचिन वाझे यांनी अचूक टायमिंग साधत अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अनिल देशमुख यांचा पाय खोलात जाण्याची शक्यता आहे.

जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना सचिन वाझे याने प्रथमच प्रसारमाध्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत. मी सुद्धा देवेंद्र फडणवीस याना पत्र लिहून सर्व माहिती दिली आहे असं म्हणत सचिन वाझे याने खळबळ उडवून दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे आत्ताच सचिन वाझे याने हा आरोप केला आहे. एकीकडे अनिल देशमूख हे फडणवीसांवर आरोप करत असताना सचिन वाझेने ध्यानी मनी नसताना थेट देशममुखांवरच आरोप केल्याने या संपूर्ण प्रकरणाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे. तसेच सचिन वाझेने देशमुखांवर आरोप केल्यानंतर गृहमंत्री फडणवीस आता काय भूमिका घेणार ते सुद्धा पाहायला हवं.

अनिल देशमुख यांनी काय आरोप केले होते?

मी गृहमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या एका खास व्यक्तीने मला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे याना अडकवण्यासाठी काही प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास सांगितलं होत. १०० कोटी वसुली प्रकरणात उद्धव ठाकरेंचं नाव घ्या, आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन या मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचा खून केला असं या प्रतिज्ञापत्रात लिहिले होते. मी जर तेव्हा सही केली असती तर विनाकारण उद्धव ठाकरे हे प्रचंड अडचणीत आले असते आणि आदित्य ठाकरे तर जेलमध्ये गेले असते. ठाकरे सरकार सुद्धा तेव्हाच कोसळलं असते. मात्र मी दबावाला बळी न पडता सही केली नाही. राजकीय नेत्यांच्या मुलाला खोट्या आरोपात अडकवता येईल याप्रकारचा प्रयत्न ३ वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केला असं अनिल देशमुख यांनी म्हंटल होते.